Thursday, May 14

Railway station name ; धर्माबाद रेल्वे स्टेशनला पहिले हुतात्मा पानसरे यांचे नाव देण्यात यावे -NNL

नांदेड, गोविंद मुंडकर। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने पंधरा दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन चळवळी योद्धा स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच आणि राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

IMG 20240922 WA0042 Railway station name ; धर्माबाद रेल्वे स्टेशनला पहिले हुतात्मा पानसरे यांचे नाव देण्यात यावे -NNL

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा शाखा नांदेड आणि चळवळी योद्धा स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने *मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम पंधरा दिवस राबविण्यात येत आहेत. दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची जन्मभूमी सध्या स्थितीतल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील असली तरी कर्मभूमी धर्माबाद राहिली आहे. नांदेड येथील रेल्वे स्थानका प्रमाणे पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्थानकास देण्यात यावे. अशी मागणी राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश आणि चळवळी योद्धा स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच यांच्या वतीने करण्यात आली आहे.

IMG 20240922 WA0038 Railway station name ; धर्माबाद रेल्वे स्टेशनला पहिले हुतात्मा पानसरे यांचे नाव देण्यात यावे -NNL

याबाबत पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या संघर्षमय जीवनाची संक्षिप्त विवेचन करण्यात आले मराठवाडा मुक्ती संग्रामातील योद्धांची आठवण म्हणून हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केलेल्या निवेदनावर डॉ. शिवदास हमंद, गोविंद मुंडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. समविचारी संघटनांच्या माध्यमातून हा विषय पुढे नेण्यात येणार आहे.दरम्यान मराठवाडा विकास परिषदेचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठकीचे ही नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!