नांदेड l सध्या चालू असलेल्या अर्धापूर तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगावच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.


यामध्ये प्रामुख्याने १४ वर्षाखालील मुलींचा संघ अर्धापूर तालुक्यातून प्रथम क्रमांकाने पात्र होऊन जिल्हास्तरासाठी रवाना झालेला आहे. तसेच इतर क्रीडा प्रकारात बॅडमिंटनमध्ये द्वितीय क्रमांक, खो खो मध्ये द्वितीय क्रमांक, द्वितीय क्रमांक, कराटे जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे.


यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सौ.शशिकला बिरादार ,सचिव संभाजीराव बिरादार ,कोषाध्यक्ष सत्यजित बिरादार ,प्राचार्य डॉक्टर वानखेडे,वाघ व सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
