HomeनांदेडGanesh raut ; बसपा पक्षाकडून संधी मिळाल्यास हदगाव, हिमायतनगर विधान सभा निवडणूक...

Ganesh raut ; बसपा पक्षाकडून संधी मिळाल्यास हदगाव, हिमायतनगर विधान सभा निवडणूक लढविण्यास तयार –  गणेश राऊत -NNL

हिमायतनगर। बहुजन समाज पार्टीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मी  निष्ठेनं करीत आहे.  विधान सभा अध्यक्ष म्हणून ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात केलेले आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मला बसपाकडून संधी मिळाल्यास मी निवडणूक लढविण्यास मी तयार आहे.  असे मत बसपाचे नेते माजी विधान सभा अध्यक्ष गणेश राऊत यांनी  केले.

यावेळी पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे.  गेल्या जिल्हापरिषद निवडणूकीत माझ्या पत्नीला सरसम जि. प. गटातून बसपाने संधी दिली होती. या निवडणूकीत धनदांडग्यांच्या विरोधात उभे राहून आम्ही सन्मान जनक मते मिळवून पक्षाचा नावलौकिक वाढविला. फूले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, मा. कांशीराम यांच्या विचाराचा वारसा खांद्यावर घेऊन काम करतांना अनेक मोर्चे,  आंदोलने करून गरजवंत व गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम अविरतपणे करीत आहे. जवळपास दोन दशके बसपाचे काम निष्ठेने करत असल्यामुळे मला पक्षाने यावेळेस संधी द्यावी.

मला जर पक्षाने हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी व तसा आदेश दिल्यास मी आगमी विधान सभा निवडणूक लढवून संधीचे सोने करीन,  या मतदारसंघात जनता घराणे शाहीला वैतागली आहे.  जनता परिवर्तनाच्या मार्गावर आहे.  अश्या  अवस्थेत  पक्षाने माझ्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून मला संधी द्यावी. अशी मागणी  बसपाचे गणेश राऊत यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments