Ganesh raut ; बसपा पक्षाकडून संधी मिळाल्यास हदगाव, हिमायतनगर विधान सभा निवडणूक लढविण्यास तयार – गणेश राऊत -NNL
हिमायतनगर। बहुजन समाज पार्टीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मी निष्ठेनं करीत आहे. विधान सभा अध्यक्ष म्हणून ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात केलेले आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मला बसपाकडून संधी मिळाल्यास मी निवडणूक लढविण्यास मी तयार आहे. असे मत बसपाचे नेते माजी विधान सभा अध्यक्ष गणेश राऊत यांनी केले.
यावेळी पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या जिल्हापरिषद निवडणूकीत माझ्या पत्नीला सरसम जि. प. गटातून बसपाने संधी दिली होती. या निवडणूकीत धनदांडग्यांच्या विरोधात उभे राहून आम्ही सन्मान जनक मते मिळवून पक्षाचा नावलौकिक वाढविला. फूले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, मा. कांशीराम यांच्या विचाराचा वारसा खांद्यावर घेऊन काम करतांना अनेक मोर्चे, आंदोलने करून गरजवंत व गोरगरीबांन...
