Anil waghmare ; डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव -NNL
बीड। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर संपादक अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्य भरातील स्नेही मित्र तसेच सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक तसेच प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार स्नेही मित्रांचे संपादक अनिल वाघमारे यांनी आभार व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पुण्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद राज्यस्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रम दरम्यान बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांची मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर केली.
संपादक अनिल वाघ...

