Tuesday, July 7

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Charging of teacher’s scooter : शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या स्कुटीला चार्जिंग -NNL

Charging of teacher’s scooter : शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या स्कुटीला चार्जिंग -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता . कंधार येथील जि. प प्राथमिक शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार चालू असून शाळेचे शिक्षक राठोड यांच्या स्कुटीला चक्क शाळेची विज वापरून शहरातील घराचे बिल बचत करून आपल्या स्कुटीला चार्जिंग वर्गा समोरच लावून घेतात .जर चार्जिंग फुल होऊन स्फोट झाला तर याला जबाबदार कोण ? अशी चर्चा शिराढोण परिसरात सुज्ञ पालकांमधून होताना दिसून येत आहे. शाळा हे विद्येचे मंदिर आहे , येथे गावातील लहान लहान मुलांना संस्काराचे धडे दिले जातात , शाळेमध्ये विद्यादानाचे काम केल्या जाते . शिक्षकाच्या हातून विद्यार्थी घडत असतो. पूर्वीच्या काळी गुरुजींना फार मोठे स्थान होते . महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळेचे दार उघडे करून सर्वांना शिक्षण देण्याचे पवित्र काम समाजामध्ये केल्या जाते. पण आजचे शिक्षक हे आपल्या स्वार्थासाठी नोकरी करतात की काय अशी परिसरात चर्चा होताना दिसत ...
Govindram Shurnar ; बाल वयात बाळावर बाल संस्कार करणे पालकांचे कर्तव्य ठरते – गोविंदराम शूरनर – NNL

Govindram Shurnar ; बाल वयात बाळावर बाल संस्कार करणे पालकांचे कर्तव्य ठरते – गोविंदराम शूरनर – NNL

नांदेड, करियर
नांदेड l होळकर नगर सिडको नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालयात सम्राट यशवंतराव होळकर,संत जगनाडे महाराज यांची जयंती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाल वाचक मेळावा संस्थेचे अध्यक्ष गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. गोविंदराम शूरनर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, आपले पाल्याचे भविष्य उज्ज्वल होऊन राष्ट्राहित जोपासावे असे वाटत असेल तर, बालपणापासून बाळावर चांगले संस्कार केले पाहिजे. पाल्याच्या शिक्षणा बरोबर संस्कार ही दिले पाहिजे तरच भविष्यात समाज प्रबोधन करून संघटन मजबूत करण्या योग्य बनतील आणि हक्कासाठी संघर्ष योग्य पध्दतीने करतील , तरच त्यांच्या उज्ज्वल भविष्या बरोबरच राष्ट्र मजबुत घडविण्यास मदत होईल . त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण, संस्कार,संघटन , आणि संघर्ष करण्या लायक बनवावे असे प्रतिपादन शूरनर यांनी केले. प...
The students saluted : सतत १८ तास अभ्यास उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले महामानवास अभिवादन -NNL

The students saluted : सतत १८ तास अभ्यास उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले महामानवास अभिवादन -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त दि.६ डिसेंबर २०२४ रोजी सतत १८ तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानच्या अध्यक्षा विमल खराटे,सचिव ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्या श्रीमती एन.एस. जयस्वाल व प्रा.जयकुमार खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला. मागील पंधरा वर्षापासून हा उपक्रम या विद्यालयात अविरतपणे राबविल्या जाते,याव्दारे विद्यार्थांना अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी,वाचन संस्कृती दृढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून चिंतन,मनन व्हावे,त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. ह्या उद्दात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात  येते. यामध्ये इयता १० वी व १२ वी वर्गातील जवळपास...
Venkatesh Chaudhary : असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून सुसंस्कृत नागरिक तयार करा – व्यंकटेश चौधरी -NNL

Venkatesh Chaudhary : असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून सुसंस्कृत नागरिक तयार करा – व्यंकटेश चौधरी -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत वाजेगाव बीटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन हजरतह फातेमा हायस्कूल बोंढार रोड येथे उपशिक्षणाधिकारी गौसिया वडजकर यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. यात परिसरात १५ वर्षापुढील असाक्षरांचे सर्वेक्षण करून स्वयंसेवक नेमणूक करण्यात आली आहेत. या असाक्षराचे वर्ग चालू करावे .साक्षरतेमुळे माणूस सुसंस्कृत होतो. अधुनिक डिजिटल युगात मोबाईल संगणक साक्षरता आवश्यक आहे. तसेच दैनंदिन व्यवहारात आर्थिक व्यवहार संपूर्ण डिजिटल पध्दतीने केले जाते. हि साक्षरता नवसाक्षराना अवगत झाली पाहिजे. म्हणून भारत सरकारने "नवभारत साक्षरता कार्यक्रम " राबवत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक शिक्षक स्वयंसेवक विद्यार्थी, नागरिकांनी असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी सहकार्य करावे. असे आव्हान मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.या बीटस्त कार्यशाळेचे आयो...
Narayanarao Chavan : नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजला नॅक समितीचा A ग्रेड दर्जा प्राप्त – NNL

Narayanarao Chavan : नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजला नॅक समितीचा A ग्रेड दर्जा प्राप्त – NNL

नांदेड, करियर
नांदेड| नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मूल्यमापन आणि मान्यता परिषदेच्या (NAAC) मूल्यांकनामध्ये 3.05 चा प्रभावी सीजीपीए स्कोर मिळवून महाविद्यालयाने A ग्रेड प्राप्त केलेला आहे. दिनांक 28 व 29 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयास नॅक पिर टीमने दोन दिवसीय भेट दिली होती. यावेळी महाविद्यालयातील शैक्षणिक व मूलभूत सेवा सुविधांचे आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन केले होते. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, सौ. अमिताताई चव्हाण, उपाध्यक्षा, शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, डी.पी. सावंत साहेब, सचिव, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, मा. डॉ. आर. के. शेंदारकर, सहसचिव, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, श्री. ॲड उदयरावजी निंबाळकर, कोषाध्यक्ष, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी व सर्व कार्यकारणी सदस्य यांनी महाविद्यालयातील सर्वच...
CIDCO Regional Office ; अखेर मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ . मिर्झा बेग यांची नियुक्ती.. – NNL

CIDCO Regional Office ; अखेर मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ . मिर्झा बेग यांची नियुक्ती.. – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून अनेक अधिकारी नियुक्ती झाली मात्र नागरीकांच्या अडीअडचणी व‌ प्रलबिंत कामांना गती देण्यासाठी, मालमत्ता कर, पाणी पट्टी थकबाकी ‌वसुलीसाठी कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी डॉ. मिर्झा बेग यांची पुर्ण वेळ सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश काढले असून करनिरीक्षक सह वसुली लिपीक व्दारे दैनंदिन मालमत्ता, पाणी पट्टी करात वाढ झाली आहे. नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी आयुक्त म्हणून गेल्या अनेक ‌वर्षांपासून प्रभारी आयुक्त म्हणून ‌ नियुक्ती अधिकारी यांनी या क्षेत्रीय कार्यालयचे काम पाहिले, 18 ऑक्टोबर रोजी डॉ. मिर्झा बेग यांनी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली,प्रभारी सहाय्यक आयुक्त असल्याने कर्मचारी व अध...
Voice of media ; व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार यांची निवड -NNL

Voice of media ; व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार यांची निवड -NNL

करियर, नांदेड
किनवट| व्हॉइस ऑफ मीडिया किनवट शाखेची बुधवारी (४ डिसेंबर) वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. सदर बैठकीत नविन कार्यकारीणी तयार करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार तर सचिवपदी सुरेश कावळेंसह सर्व पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी आणि इत्तर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी शिक्कामोर्तब केला. व्हाॅईस आँफ मीडियाच्या किनवट तालुका शाखेची ४ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या गोकुंदा येथिल विश्रामगृहात वार्षिक सर्व साधारण सभा जगदीश सामनपेल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मागिल वर्षभरातील कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. तदोपरांत २०२४-२०२५ एक वर्षासाठी कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून दुसर्‍यांदा जगदीश सामनपेल्लीवार तर सचिव म्हणून सुरेश कावळेंची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष संतोष सिसले आणि उपाध्यक्ष विव...
Closer students’ relationship with soil : जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…! -NNL

Closer students’ relationship with soil : जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…! -NNL

करियर, नांदेड
नांदेड| दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात झपाट्याने वाढतच चालेले शहरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे मृदेची अधिक प्रमाणात झीज होत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होत‌ आहे. त्यामुळे यासंदर्भात शेतकरी आणि सामान्य माणसांसह विद्यार्थ्यांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याच्या उद्देशाने जवळा देशमुख येथे विद्यार्थ्यांचे 'जडले मातीशी नाते' हा कार्यक्रम घेण्यात आला. जागतिक मृदा दिनानिमित्त जवळा देशमुख येथील जिल्...

Vigyan Bharati ; विज्ञान भारतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा विद्यार्थी विज्ञान मंथन या‌ वर्षी नांदेड येथे ; NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l विज्ञान भारतीतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच "विद्यार्थी विज्ञान मथन". या परीक्षेतील राज्यस्तरीय पातळीची परीक्षा या वर्षी नांदेड येथे येत्या ८ डिसेंबरला श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड येथे होत आहे. ही परीक्षा विज्ञान भारतीच्या सोबत एनसीईआरटी आणि एनसीएसएम, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. या‌ वर्षीचे देवगिरी प्रात (मराठवाडा खान्देश) आणि विदर्भ प्रांत येथील विद्यार्थ्यां साठीचे राज्यस्तरीय शिबीर हे नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियात्रिकी व तत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड येथे संपन्न होणार आहे. परीक्षा सपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांची शास्त्रज्ञांसोबत चर्चा हे सत्र घेण्यात येते. त्या करिता आपल्या नांदेड मधील स्वामी रामानंद तीर्थ मराठ...
Balirampur ; बळीरामपुर उपकेंद्र अंतर्गत शाळेत जंतू नाशक‌ गोळ्या वाटप – NNL

Balirampur ; बळीरामपुर उपकेंद्र अंतर्गत शाळेत जंतू नाशक‌ गोळ्या वाटप – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र बळीरामपुर येथील जिल्हा परिषद शाळा येथे सरपंच सौ. रेणुका पांचाळ यांचा हस्ते सुरुवात करण्यात आली यावेळी परिसरातील 500 विध्यार्थी यांना‌ वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा‌ बळीरामपुर‌ उपकेंद्र अंतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्याभवन शाळा, विवेकानंद शाळा, अंगणवाड्या येथील विद्यार्थी व बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या ,येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विवेक‌ पदमणे,आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक मोहम्मद खैसर , शेख जमीला, सुनिता भद्रे, व केंद्र प्रमुख मठपती, मुख्याध्यापक सुनिता चंदावार ,‌ ढवळे, शिंगोटे, हंबर्डे यांच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व आशाताई हजर होते....
error: Content is protected !!