नवीन नांदेड। छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या भारतीय थल सेना मध्ये सिडको येथील युवक सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी निवड झाली असून या बदल मित्र परिवार व कुटुंबीयांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.


टाकळगाव ता.लोहा येथील व सध्या सिडको परिसरातील राहणारे युवक संघदिप साहेबराव जोंधळे यांनी सैन्य भरती साठी कुठलीही अकॅडमी कडे न जाता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी येथील मैदानावर सराव करत व स्पर्धा परीक्षा माध्यमातून हे यश संपादन केले असून यावर्षी आगस्ट मध्ये झालेल्या मैदानी चाचणी परीक्षा नंतर २३ सप्टेंबर रोजी या भरती परिक्षा निकाल लागला.


यात ते सैन्य भरती साठी पात्र ठरले. निकाल लागताच सर्वमीत्र परिवाराने सत्कार करून अभिनंदन केले आहे, तर ग्रामपंचायत टाकळगाव यांच्या वतीने सरपंच प्रतिनिधी भिमराव लामदाडे, उपसरपंच प्रतिनिधी संभाजी चिंतोरे व समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
