नवीन नांदेड। जागतिक हदय दिनानिमित्त हडको परिसरातील भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट व रोटरी क्लब नांदेड, गेल्नमार्क फार्मासिस्ट यांच्या वतीने काढण्यात आलेल्या जनजागृती रॅली मध्ये डॉक्टर, जेष्ठ नागरिक, पत्रकार, व भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूट विधार्थी यांनी सहभागी होत हडको ते अण्णा भाऊ साठे पुतळा ही रॅली काढली.


२० सप्टेंबर रोजी जागतिक हदय दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूट हडको, रोटरी क्लब नांदेड , गेल्नमार्क फार्मासिस्ट यांच्या वतीने आयोजित या रॅली चे उदघाटन डॉ. शुभांगी पंतगे,डॉ.रेणुका अग्रवाल, डॉ. सुरेखा कलंत्री, डॉ. नरेंश रायेवार,डॉ.प्रमोद पाटील, डॉ. संतोष महाजन, डॉ. अशोक भिसे, डॉ. गजेंद्र देशपांडे, रोटरी क्लब सचिव डॉ. अंबुलंगेकर, प्राचार्य, संभाजी सुर्यवंशी, दलित मित्र नारायण कौलंबीकर,सामाजिक कार्यकर्ते, विनोद जाधव, हारि पाटील, भरत धुत, पत्रकार, जेष्ठ नागरिक व भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूट विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या रॅलीला हिरवी झेडीं दाखवून सुरूवात करण्यात आली, यावेळी डॉ. पंतगे यांनी जागतिक हदय दिनानिमित्त संबंधित रूग्नांनी , दैनंदिन व्यायाम करणे गरजेचे असून वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. अशोक कलंत्री यांनी करत उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले. ही रॅली यशस्वी होण्यासाठी गेल्न मार्क फार्मासिस्ट रवी भायकाटे, मनिष लालपोतु, माधव भालेराव, नागेश दरगु यांनी परिश्रम घेतले, या रॅलीचा समारोप सिडको अण्णा भाऊ साठे पुतळा स्मारक येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.
