नांदेड। सामाजिक,राजकीय कार्यात सदैव अग्रेसर व्यक्तिमत्व व मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे कामारीकर यांना मान नेतृत्वाचा सन्मान कर्तत्वाचा सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.


दै.वीर शिरोमणी, सा.नंदगिरीचा कानोसा व मायडी सेवाभावी संस्थेच्यावतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांचा गौरव नांदेडमधील गणराज पॅलेस येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, मनपाच्या माजी सभापती सौ.संगिता पाटील डक,रिपाई (आ.) महिला आघाडीच्या नेत्या वैशालीताई हिंगोले, ह.भ.प. एकनाथ महाराज कंधारकर, ह.भ.प.नामदेव महाराज बारुळकर,या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते सचिन कासलीवाल,मार्गदर्शक त्रिरत्नकुमार भवरे, संयोजक दै.वीर शिरोमणीचे संपादक शंकरसिंह ठाकूर,

सा. नंदगीरीचा कानोसा चे संपादक मारोती शिकारे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उद्योग व व्यापार आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्रीधर नागापूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दत्ता पाटील तळणीकर आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासीत पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या उत्तुंग योगदानासह त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकर्तत्वाला प्रेरणा देण्यासाठी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भवरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
