हिमायतनगर, अनिल मादसवार। गेल्या २४ तारखेपासून मजुरदार महिला – पुरुष नागरिकांनी हिमायतनगर येथील नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे. आंदोलन सुरू असताना शहरात दोन वेळा आमदार महोदय येऊन गेले मात्र त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी साधी भेट दिली नाही. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आल्याने सातव्या दिवशी आमदारांनी भेट देऊन आंदोलन कर्त्याच्या मागण्या मीच पूर्ण करू शकतो असा दाखविण्याचा केविलवाला प्रयत्न केला आहे. मागील निवडणूक पूर्वी वस्तीतील नागरिकांना 43 नंबर मालकी प्रमाणपत्र मिळवून देतो म्हणून दिलेलं आश्वासन हवेतच विरल आहे. त्यामुळे न्याय हक्कासाठी मतदार संघातील महिलांना सात सात दिवस आंदोलन करावं लागतं ही एक मोठी शोकांतिका आहे. राजकीय नेते त्यांच काम करत राहतील… आपण आपलं आंदोलन सुरु ठेऊ… असा एल्गार कॉ उज्वला पडलवार यांनी पुकारत नगरपंचायत होश में आओ…… होश में तुमको आणा होगा.. आणा होगा….. आणा होगा… आमच्या मागण्या मान्य करा.. नाहीतर खुर्च्या खाली करा… अश्या घोषणाबाजी देत जोपर्यंत लेखी आश्वासन आणि उपस्थितांना जॉब कार्ड वितरित केले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
लोक विकास समन्वय संघर्ष समिती व सी.टु. कामगार संघटना हिमायतनगर तर्फे विविध मागण्याबाबत दिनांक ०८ ऑगस्ट २०२४ रोजी रोजी नगरपंचायतीला पत्र दिले होते. त्या पत्रानंतर नपने १० दिवसात जॉब कार्ड बाटप करू असे लेखी दिले पण जॉब कार्ड तर मिळालेच नाही तर इतर मागण्यांचा काय..? हि बाब लक्षात घेऊन गोलमाल उतरे दिली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पासुन बेमुदत साखळी उपोषण नगरपंचायत समोर केले जात आहे. मागील ७० वर्षापासुन ग्रामपंचायतने दिलेल्या जागेवर शहरातील बेघर, गोरगरीब मांगास वर्गातील लोक राहतात. त्या जागेवर कच्चे घर उभारून नगरपंचायतचा घर भाडे, पाणी पट्टी, व ईतर कर भरूण शेकडो कुटुंब वास्तव्य करतात. त्या घराचा सर्वे करून त्याना नमुना नं. ४३ अ मालकी हक्क प्रमाण पत्र देवून घरकुलाचा लाभ द्यावा. घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत कंत्राटी सफाई कामगाराना किमान वेतन व शासन निर्णय दि.३१/१०/२०२३ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील महिलांचा आर्थिक व सामाजीक स्तर उंचावण्यासाठी महिला बचत गट निर्माण करून शासकीय योजनाचा लाभ द्या. वृध्द भुमिहिन दिव्यांग निराधार लाभार्थ्यांना महिना ५००० रूपये अनुदान द्या. निराधार योजनेतील जाचक अटी जश्या (२१००० आतील उत्पन्न व शेती व मुल नसने) रद्द करा. जेष्ट नागरिकाना १०००० रूपये पेन्शन देऊन विसावा केंद्र उभारा. हिमायतनगर शहरात एम आय डी. सी. उभारून तरूणाना कामे द्या. आणि शहर व तालुक्याला ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करा, हमी भावाने सरकारी खरेदी केंद्र सुरू करा. अश्या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून शहरात धरणे आंदोलन सुरु आहे.
या आंदोलनास काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष डॉ.रेखाताई चव्हाण यांनी दोन वेळा भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे. दरम्यान नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्याने आज सातव्या दिवशी आंदोलन कर्त्याच्या प्रमुख मागण्याबाबत चर्चा केली. मात्र ती चर्चा विफल ठरली असून, केवळ तोंडी चर्चा करून चालणार नाही आमच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र द्या. अन्यथा आमचे आंदोलन असेच सुरू राहील, न्याय हक्काच्या मागणीसाठी प्रसंगी नगरपंचायतीच्या नाकर्तेपणाच्या विरोधात कार्यालयात घुसून आंदोलन करू असा इशारा कॉ. उज्वला पडलवार, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रेखाताई चव्हाण यानी यावेळी दिला आहे. दरम्यान आंदोलन कर्त्यांच्या मागण्यासाठी मुख्याधिकारी यांना फोन लावला मात्र त्यांनी फोन उचलला नाही मीटिंगमध्ये आहे. असे सांगून गेल्या सात दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली आणि आमदार साहेबांनी फोन लावला की त्यांनी लगेच फोन उचलला.. असा आरोपही त्यांनी केला.
या प्रकारावरून कॉम्रेड उज्वला पडलवार मुख्याधिकाऱ्यावर चांगल्या भडकल्या आणि अधिकाऱ्यांना सात दिवसापासून आंदोलन करत असलेल्या महिलांचं काही देणंघेणं नाही आंदोलन कर्त्यांचे ते फोन उचलत नाहीत…. अशी कोणती मीटिंग चालू आहे तुमची …. याबाबतही येणाऱ्या काळात आम्ही जाब विचारू…. अगोदर आमच्या सर्व महिलांच्या मागण्या पूर्ण करून तात्काळ जॉब कार्ड वाटप करा. ज्या नागरिकांना आतापर्यंत नमुना नंबर 43 देण्यात आला नाही त्यांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र द्या. अन्यथा आंदोलन असेच सुरू राहील दिवसेंदिवस याची तीव्रता वाढेल असा इशारा दिला आहे. इशाऱ्याने हैराण झालेल्या नपच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी चार वाजता तयार झालेल्या नऊ महिलांना जॉब कार्ड वितरित केले. तसेच दररोज ४० जणांना जॉबकार्ड वितरीत केले जाईल असे लेखी शाश्वसन दिले आहे. या जोपर्यंत सर्व महिलांना जॉब कार्ड मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर नगरपंचायतीने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आंदोलकर्ते कॉमरेड दिगंबर काळे, डांगे, उपाध्यक्ष नविन मादसवार, गणेश रच्चेवार, आदींसह आंदोलनकर्त्या महिला – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले हक्क मिळविण्यासाठी महिलांनी लढायला शिकावं – डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर
एका महिलेचं दुःख दुसरी महिलाच जाणवू शकते….. मी सदैव तुमच्या सोबत आहे.. राजकारण दुसऱ्या बाजूला समाज कारण एका बाजूला आहे… समाजासाठी काम करणारी मी सामाजिक कार्यकर्ती आहे. संघटनेमुळे सर्वकाही शक्य आहे. आज तुम्ही जे संघटन उभं केलं त्यामुळे प्रशासनावर दबाव बनला गेला आहे. त्यामुळे संघटितपणे लढा देऊन आपले हक्क मिळविण्यासाठी महिलांनी लढायला शिकावं असा संदेश डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी आंदोलनकर्त्या महिलांना दिला.