लोहा| राज्य सरकारने शाळास्तर उंचवावा तसेच भौतिक गुणात्मक विकास व्हावा या हेतून मागील वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा अभियान सुरु, केले आहे. या शैक्षणिक वर्षात टप्पा-२- अभियान सुरू झाले . मागील महिण्यात केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय मूल्यमापन झाले. यात खाजगी व्यवस्थापन गटातून लोहा शहरातील जयमहाराष्ट्र प्राथमिक शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक तर पारडीच्या इंग्लिश स्कूलने खाजगी गटात द्वितीय क्रमांक पटकवला आहे.
शासकीय शाळा गटातून जि.प.प्रा.शाळा पारडी विभागीय स्तरावर स्पर्धेत आहे जिल्हा प्रशाला धानोरा मक्ता व दगडगावची शाळा प्रथम आली आहे. तालुक्याचा निकाल गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा २ चे केंद्र व तालुका स्तरीय मूल्यमापनात जि. प. प्राथमिक शाळा २०२३-२४ मध्ये जि. प. प्रा. शाळा पारडी जिल्हास्तरावर प्रथम आली होती आता दुसऱ्या टप्प्यात विभागीयस्तवर स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा २ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा मक्ता (प्रथम) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव (प्रथम) , जि.प प्राथमिक शाळा , गोलेगाव (द्वितीय),तर जिलग परिषद प्राथमिक शाळा रामतीर्थ (तृतीया ) असा क्रमांक पटकवला आजखाजगी व्यवस्थापना गटात लोह्याची जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा (प्रथम) पारडीची सहयाद्री इंग्लीश स्कूल (द्वितीय) जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय पांगरी (तृतीय), संत नामदेव कनिष्ठ महाविद्यालय माळाकोळी (तृतीय) असा क्रमांक आला असून गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी निकाल जाहीर केला आहे.
जस्या महाराष्ट्र प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष भालेराव व त्याच्या शिक्षकांनी दोन महिने मेहनत घेतली गेल्या वर्षी पासून तयारी सुरू केली आणि टीम।भालेराव ने तालुक्यात अव्वल स्थान पटकाविले.संस्थेचे उपाध्यक्ष नवनाथ बापू चव्हाण यांनी आपल्या शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य केले .मुख्याध्यापक संतोष भालेराव त्याचे सहकरी शिक्षिका जे डी चोले .,बी ए .आडगावकर ,एन एल .वाघमारे, श. एस एन कौठेकर .एस एस .कुलकर्णी ., आर आर .पारेकर., एस.एम.राठोड याच्या टीमचे हे यश निश्चित कौतुकास्पद आहे अशी शाबासकीची थाप संस्थापक माजी आमदार रोहिदास चव्हाण , उपाध्यक्ष नवनाथ बापू चव्हाण , माजी नगराध्यक्षा आशाताई चव्हाण व सर्व संचालक यांनी दिली व अभिनंदन केले.