Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Children’s Drama Competition : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नांदेड येथे बालनाट्य स्पर्धा संपन्न; विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप -NNL

Children’s Drama Competition : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नांदेड येथे बालनाट्य स्पर्धा संपन्न; विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभागाच्या कामगार कल्याण मंडळ विभागीय गट कार्यालय लेबर कॉलनी नांदेड येथे दि. 13 डिसेंबर 2024 शुक्रवार रोजी खुली बाल नाट्य स्पर्धा 2024-2025 पार पडली. या बाल नाट्य स्पर्धेमध्ये एकुण 12 बाल नाट्य संघ स्पर्धक सहभाग नोंदवून आपापले नाट्य सादरीकरण केले. पैकी तीन विजेते स्पर्धक निवडण्यात येऊन रोख धनादेश प्रथम क्रमांक ललीत कला भवन लेबर कॉलनी नांदेड रुपये 2500/-, द्वितीय पारितोषिक कामगार कल्याण केंद्र हिंगोली 2000/-, तृतीय पारितोषिक कामगार कल्याण केंद्र सिडको नांदेड 1500/- रुपये, अभिनय मुले बक्षीस तीन स्पर्धक, अभिनय मुली बक्षीस तीन स्पर्धक, दिग्दर्शन बक्षीस तीन, प्रत्येकी 800, 600, 400 रोख धनादेश व प्रशस्तीपत्र आणि या स्पर्धेत सहभागी बालनाट्य कलावंत, कामगार कुटुंबिय व ईतर कलावंत 130 जणांना सहभाग प्रशस्तीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करुन सन्मा...
Declaration of Service Dedication Family : राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार; सेवा समर्पण परिवारची घोषणा – NNL

Declaration of Service Dedication Family : राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार; सेवा समर्पण परिवारची घोषणा – NNL

नांदेड, करियर
भोकर| सेवा समर्पण परिवार च्या वतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असल्याचे माहिती सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिली. सेवा समर्पण परिवार च्या वर्धापन दिनानिमित्त मागील तीन वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यावर्षी मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा समर्पण पुरस्कार आणि गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी आणि गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांना राज्यस्तरीय महिला विकास सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, मानपत्...
Waghala Talathi Office ; वाघाळा तलाठी कार्यालय येथे ग्राम महसुल अधिकारी म्हणून अंजुषा‌ जाधव यांनी घेतला पदभार – NNL

Waghala Talathi Office ; वाघाळा तलाठी कार्यालय येथे ग्राम महसुल अधिकारी म्हणून अंजुषा‌ जाधव यांनी घेतला पदभार – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l वाघाळा तलाठी कार्यालय येथे ग्रामविकास महसूल अधिकारी म्हणून अंजुषा जाधव यांनी पदभार घेतला‌ असुन कार्यालयीन सहाय्यक यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. ‌वाघाळा तलाठी कार्यालय येथील कार्यरत तलाठी चंद्रकांत ‌कंगळे‌ यांच्यी मंडळ अधिकारी म्हणून किनवट पदोन्नती वर‌ बदली झाल्यामुळे नांदेड तहसील कार्यालय येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अंजुषा जाधव यांच्यी वाघाळा तलाठी कार्यालय येथे ग्राम महसूल अधिकारी पदावर नियुक्ती झाली असून 10 डिसेबंर रोजी त्यांनी कार्यालय येथे पदभार घेतला आहे. कार्यालयीन सहाय्यक व्यंकट इंगळे, जाधव यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या....
Manohar kadam ; मनोहर कदम यांना लोकसंवाद उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर -NNL

Manohar kadam ; मनोहर कदम यांना लोकसंवाद उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर -NNL

करियर, नांदेड
नांदेड। दैनिक गोदातीचे उपसंपादक , पत्रकार मनोहर कदम यांना यावर्षीचा लोकसंवाद राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . भोकर येथे पार पडणाऱ्या लोकसंवाद साहित्य संमेलनात दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार मनोहर कदम यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता.उमरी, जि. नांदेडच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. 20 व्या लोकसंवाद ग्रामीण संमेलनात खा. रवींद्र चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. रामराव पाटील, आ. राजेश पवार, शिरीषभाऊ गोरठेकर, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून नांदेड ज...
Storytelling by Ram Tarte today at Narangal : राम तरटे यांचे आज नरंगल येथे कथाकथन -NNL

Storytelling by Ram Tarte today at Narangal : राम तरटे यांचे आज नरंगल येथे कथाकथन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| प्रसिद्ध कथाकार तथा आकाशवाणी नांदेड केंद्राचे निवेदक , पत्रकार राम तरटे यांचे आज दि. ११ डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील नरंगल बु. येथे महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. श्री वीरभद्र शिक्षण प्रसारक मंडळ नरंगल बु. संचलित महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आद्य संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव गोविंदराव पाटील नरंगलकर यांच्या ३५ व्या स्मृती दिनानिमित्त 'लेखक आपल्या भेटीला...' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांचे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोक देशमुख यांची उपस्थिती राहणार असून, प्राचार्य पी.एम. शिवारेड्डी, ए.एस. गोपछडे, पी.जी. हळदे, एस.जी. नक्कावार, एच.टी. सूर्यवंशी, एम.जी. डोकोरे, एच.बो. बोडके, आर.जी. बरडे यांची प्रमुख उपस्थित...
Zilla Parishad School.; जिल्हा परिषद शाळेची. शालेय व्यवस्थापन समिती जाहीर अध्यक्षपदी धनंजय घोरबांड तर उपाध्यक्ष राम मोरे – NNL

Zilla Parishad School.; जिल्हा परिषद शाळेची. शालेय व्यवस्थापन समिती जाहीर अध्यक्षपदी धनंजय घोरबांड तर उपाध्यक्ष राम मोरे – NNL

करियर, नांदेड
उस्माननगर l येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ( मुलांची ) शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाची नुकतीच बैठक बोलावून खेळीमेळीच्या वातावरणात शालेय व्यवस्थापन समिती सर्वानुमते अध्यक्ष म्हणून धनंजय विठ्ठल पाटील घोरबांड तर उपाध्यक्षपदी राम बालाजी मोरे यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाची विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात येणार असल्याचे उपस्थित पालकांना शासन परिपत्रकानुसार वाचन करून सांगितले. त्यानंतर आरक्षण पध्दतीने प्रत्येक वर्गातून पालकांची निवड करण्यात आली. उपस्थित निवडलेल्या सदस्य पालकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड होताना खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष म्हणून धनंजय विठ्ठल पाटील घोरबांड तर उपाध्यक्ष राम बालाजी मोरे यांच्या नावाची सर्वानुमते...
Vigyan Bharati ; विज्ञान भारती आणि एस.जी.जी एस. यांच्या द्वारे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान शिबिर संपन्न – NNL

Vigyan Bharati ; विज्ञान भारती आणि एस.जी.जी एस. यांच्या द्वारे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान शिबिर संपन्न – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेड येथे श्री गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात, विदयार्थी विज्ञान मंथन (VVM)२०२४-२५ परीक्षा संपन्न झाली. 8 डिसेंबर रोजी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेची राज्य स्तरीय शिबिर/कॅम्प अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आला. विद्यार्थी विज्ञान मंथन ही स्पर्धा परीक्षा एन.सी.ई.आर.टी. एन.सी.एस.एम.व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यां करिता घेण्यात येते. विज्ञान विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शन मिळावे व संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.याची प्रथम फेरी ही दिनांक २३ व२७ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन माध्यमातून पार पडली.त्यात संपूर्ण देशात १.५ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली....
Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL

नांदेड, करियर
नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार स्वाधार साठी पात्र विध्यार्थ्यास अर्ज कण्यासाठी 16 डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी खालील निकषा प्रमाणे अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष/सूचना विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्...
Appointment of Sudhakar Kadam as Vasmat Taluka President : सुधाकर कदम यांची वसमत तालुकाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

Appointment of Sudhakar Kadam as Vasmat Taluka President : सुधाकर कदम यांची वसमत तालुकाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

नांदेड, करियर
नांदेड| सुप्रसिद्ध कलावंत, साहित्यिक सुधाकर कदम यांची वसमत तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पारंपारिक लोक कलावंतांच्या न्याय हक्काकरिता सदैव प्रयत्नशील असणाऱ्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांनी संघटन वाढीसाठी कदम यांची निवड करून त्यांना सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.प्रमोद अंबाळकर यांच्या हस्ते दि.८ डिसेंबर २०२४ रविवार रोजी नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे, प्रसिद्धीप्रमुख सुशीलकुमार भवरे यांची उपस्थिती होती. सुधाकर कदम हे लोक कलावंत असून ते ' 'मी संत गाडगेबाबा बोलतोय' हे एकपात्री नाटक तसेच' हास्यखजिना ', 'मी शेतकरी बोलतोय' या एकपात्री नाट्याचे शाळा,महाविद्यालय, खेडेगाव, वसतिगृह, गणेशोत्सव,नवरात्रोत्सव, महिला बचतगटांमध्ये एकपात्री नाट्य प्रयोग सादर करतात. त्यांच्या नाट्य क्षेत्रातील...
Charging of teacher’s scooter : शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या स्कुटीला चार्जिंग -NNL

Charging of teacher’s scooter : शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या स्कुटीला चार्जिंग -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता . कंधार येथील जि. प प्राथमिक शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार चालू असून शाळेचे शिक्षक राठोड यांच्या स्कुटीला चक्क शाळेची विज वापरून शहरातील घराचे बिल बचत करून आपल्या स्कुटीला चार्जिंग वर्गा समोरच लावून घेतात .जर चार्जिंग फुल होऊन स्फोट झाला तर याला जबाबदार कोण ? अशी चर्चा शिराढोण परिसरात सुज्ञ पालकांमधून होताना दिसून येत आहे. शाळा हे विद्येचे मंदिर आहे , येथे गावातील लहान लहान मुलांना संस्काराचे धडे दिले जातात , शाळेमध्ये विद्यादानाचे काम केल्या जाते . शिक्षकाच्या हातून विद्यार्थी घडत असतो. पूर्वीच्या काळी गुरुजींना फार मोठे स्थान होते . महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळेचे दार उघडे करून सर्वांना शिक्षण देण्याचे पवित्र काम समाजामध्ये केल्या जाते. पण आजचे शिक्षक हे आपल्या स्वार्थासाठी नोकरी करतात की काय अशी परिसरात चर्चा होताना दिसत ...
error: Content is protected !!