कुंडलवाडी| बिलोली तालुक्याची पोलीस ठाणे कुंडलवाडी यांच्या अंतर्गत पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता के. रामलू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. तालुक्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या विशेष उपक्रमाअंतर्गत व धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोलीस ठाणे कुंडलवाडी यांच्यातर्फे पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर तालुक्यातील इयत्ता ७ वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मातृभाषेत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिकासह आकर्षक करंडक व लेखकांच्या स्वाक्षरीसह पुस्तक भेट देण्यात येणार आहे. ही स्पर्धा विनाशुल्क आहे. तसेच भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी ८ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदवावे. तालुक्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे
