Sunday, May 17

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Smita Dhanraj Patil : नांदेडची कन्या स्मिता धनराज पाटील यांची नरेडको माहीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड -NNL

Smita Dhanraj Patil : नांदेडची कन्या स्मिता धनराज पाटील यांची नरेडको माहीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेडची कन्या स्मिता धनराज पाटील यांची नरेडको माहीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), नेरडेकोचे जी. हरिबाबू, राजन बांदेलकर, अपेक्षिता तिपसे (महाव्यवस्थापक, कॉसमॉस बँक) डॉ.विद्या येरवडेकर (प्र. कुलगुरू, सिम्बायोसिस विद्यापीठ), देव गिल (प्रसिद्ध अभिनेते ), नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता पाटील, मावळत्या अध्यक्षा अनंता रघुवंशी, नरेडको पुणेचे अध्यक्ष भरत अग्रवाल स्मिता पाटील यांचे वडील नांदेड जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव आलेगावकर व आदि मान्यवर उपस्थित होते. देशातील अन्य उद्योग, व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे, भविष्यात यात अधिक वाढ होईल. यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणार्‍या बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आल...
ISO Certification of Biloli Panchayat Samiti : बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन -NNL

ISO Certification of Biloli Panchayat Samiti : बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन -NNL

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. याअंतर्गत आज बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. बिलोली पंचायत समिती आयएसओ मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील पाचवी पंचायत समिती ठरली आहे. आयएसओ मानांकन मिळवलेल्या बिलोली पंचायत समितीच्या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते. यापूर्वी नांदेड, लोहा, मुदखेड आणि देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते. बिलोली पंचायत समितीतील आयएसओ मानांकन वितरण कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी श्रीनिवास पदमावार, सहायक गट विकास अधिकारी आर.डी. क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभ...
ISO Certification of Degalur Panchayat Samiti : देगलूर पंचायत समितीस आयएसओ मानांकन -NNL

ISO Certification of Degalur Panchayat Samiti : देगलूर पंचायत समितीस आयएसओ मानांकन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. देगलूर पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांना प्रदान करण्यात आले. देगलूर पंचा...
At Shivansh Communication : शिवांश कम्युनिकेशन येथे अनेकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ -NNL

At Shivansh Communication : शिवांश कम्युनिकेशन येथे अनेकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ -NNL

नांदेड, करियर
नांदेड| तारासिंह मार्केट येथील शिवांश कम्युनिकेशन यांच्या मार्फत भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अनेक शासकीय योजनांची नाव नोंदणी व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देत अनेकांना मदतीचा हात दिला असून विद्यार्थ्यांसाठीच्या मोफत लॅपटॉप व टॅब योजनेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी या योजने अंतर्गत फ्रॉम भरून योजनेचा लाभ घेतला असल्याची माहीती शिवांश कम्युनिकेशनचे संचालक विरेंद्रसिंह हजारी यांनी यावेळी दिली. शिवांश कम्युनिकेशन येथे विद्यार्थ्यांच्या योजनांसह सुक्षिशित बेरोजगार भत्ता ,मोफत स्कुटी योजना , मोफत टॅब योजना, प्रधानमंत्री मोफत सोलार योजना यासह विविध शासकीय योजनांची नोंदणी केलेल्या अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला आहे तसेच शासनाच्या विविध योजने अंतर्गत अर्ज करायचे आहेत त्यांनी तात्काळ अर्ज भण्यासाठी आमच्या कार्यालयावर भेट दयावी १० वी पास विद्यार्थी व विद्यार्थीनी खुले ...
Allotment of student certificate : जिल्ह्यामध्ये शासनाकडून 94 टक्के विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप -NNL

Allotment of student certificate : जिल्ह्यामध्ये शासनाकडून 94 टक्के विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप -NNL

करियर, नांदेड
नांदेड| विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वाटपाची क्रमवारी, कालावधी व प्राथमिकता ठरली आहे. जिल्ह्यात कुठेही रहिवासी दाखला, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागला नसून 1 एप्रिल 2024 पासून 19 डिसेंबर पर्यंत 94 टक्के प्रमाणपत्र विहित वेळेत देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केली आहे. रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र आदींसाठी विशिष्ट वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्या वेळेत दाखले तयार होतात. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातप्रमाणत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र यासंदर्भात विहित वेळेत कार्यपद्धी अवलंबून लाभार्थ्यांना लाभ देण्याची सरासरी टक्केवारी 93 टक्के...
this year through MPSC exams : तयारीला लागा यंदा एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा -NNL

this year through MPSC exams : तयारीला लागा यंदा एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| राज्य शासनामार्फत यावर्षी मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी होणाऱ्या प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जाहिर केले आहे. त्यामुळे शासन सेवेत येण्यास इच्छूक असणाल्या गुणवान, मेहनती व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे. स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक नव्या वर्षात तुमची वाट बघत आहे. नव्या वर्षात 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे. 16 मार्च रोजी दिवाणी न्यायाध...
Forged documents ; बनावट दस्ताऐवजाच्या नुसार बंद शैक्षणिक संस्थेचे हस्तातरंण ? – NNL

Forged documents ; बनावट दस्ताऐवजाच्या नुसार बंद शैक्षणिक संस्थेचे हस्तातरंण ? – NNL

करियर, नांदेड
नांदेड। जिल्हयातील बिलोली तालुक्यात कार्यरत असलेल्या कायम स्वरूपी मान्यता रद्द झालेल्या गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रम शाळेचे हस्तांतरण केल्याचा बनावट शासन आदेश काढल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे. अनेक महीन्यांपासून थातून-मातूर तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्कालिन डीवायएसपी रामकृष्ण मळघणे यांनी आरोपी संस्था किवा संस्थाचालकांची नावे मागितली असली तरी आदिवासो प्रकल्प विभागाने त्याची अद्यापही पूर्तता केली नसल्याचे समजते. गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ बिलोली संचलित अनुदानित आश्रम शाळा अर्जापुर ता. बिलोली मान्यता कायम स्वरूपी रद करण्यात आली आहे. हा निर्णय दि. २१ जून २०२३ ला घेण्यात आला. या निर्णयानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलेली आहे. असे असले तरी ही अनुदानित आश्रम शाळा अन्य स...
Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

करियर, नांदेड
नांदेड| परिस्थिती विषम असेल तर विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा परिस्थिती विरुद्ध लढत राहावे तरच ध्येय गाठता येते. कम्फर्टझोन मधून बाहेर पडणे आणि सतत कष्ट करत राहणे विद्यार्थी जीवनात महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. संगीत नाटक अकॅडमी नवी दिल्ली यांच्या कलाधरोहर या उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. चासकर बोलत होते. संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध भारूडकार चंदाताई तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा...
MGM ; एमजीएमच्या विद्यार्थ्याची यशाला गवसणी..! – NNL

MGM ; एमजीएमच्या विद्यार्थ्याची यशाला गवसणी..! – NNL

नांदेड, करियर
नांदेड l एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड चा विद्यार्थी ओमकार सोळंके बिटेक स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन नुकताच मिलिटरी ऑफिसर केडरची ट्रेनिंग डेहराडून येथून पूर्ण करून भारतीय सैन्यदलात दाखल आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. आई- वडील अल्पभूधारक शेतकरी. बारावी नंतर त्याने स्थापत्य अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथून प्राविण्यासह पूर्ण केले. मनात देशसेवेचे वेड होतेच. तो नांदेड- भोकर रोडवरील खेरगाव या त्याच्या गावाहून दररोज एसटी ने ये जा करत असे.तो महाविद्यालयात निर्धारित वेळेच्या लवकर यायचा कारण बस लवकर येत असे,ग्रंथालयातही तो दिवस दिवस अभ्यास करत असे. वर्गातही हुशार विद्यार्थ्यांत त्याची गणती होत असे. एमजीएम मध्ये शिक्षण घेत असतानाच त्याच्या आईचे दुखत निधन झाले,अनेक दिवस आई दवाखान्यात दाखल होती,या परि...
Eklavya Residential English School : एकलव्य निवासी इंग्रजी शाळेसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्व परीक्षा -NNL

Eklavya Residential English School : एकलव्य निवासी इंग्रजी शाळेसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्व परीक्षा -NNL

नांदेड, करियर
नांदेड| इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशाकरीता रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेचा लाभ सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी, सहावी, सातवी व आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या अनुसूचित आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीमती कावली मेघना यांनी केले आहे. किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती कावली मेघना यांच्या कार्यालयाने त्यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये हे आवाहन करण्यात आले आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिकणारी मुले या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी पात्र ठरण...
error: Content is protected !!