Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Sanchita of Mahatma Phule High School : महात्मा फुले हायस्कूलच्या संचिताने विभागातून पटकावला प्रथम क्रमांक -NNL

Sanchita of Mahatma Phule High School : महात्मा फुले हायस्कूलच्या संचिताने विभागातून पटकावला प्रथम क्रमांक -NNL

करियर, नांदेड
नांदेड| अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस तर्फे दरवर्षी साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कथाकथन स्पर्धेत यंदा नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलच्या संचिताने विभागीय स्तरावर बाजी मारली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा प्रियदर्शिनी विद्या संकुल, नांदेड येथे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पद्माकर कुलकर्णी, गट शिक्षणाधिकारी व्यंकट गंदपवाड, बालासाहेब माधसवाड व विलास कोळनुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण राऊत, कविता जोशी व रूपाली गोजवडकर यांनी केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत संचिता सुभाष अष्टेकरने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक पद्मावती जाधव तर तृतीय क्रमांक अलिशा शेख यांनी पटकावला. विभागीय स्तरासाठी बाबानगरच्या महात्मा फुले हायस्कूलची निवड करण्यात आली होती. परभणी येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत संचिताने उत्कृष्ट कामगिर...
third rank in Abacus exam : पलाशा संजय नलावडे हिने मिळविला अबॅकस परीक्षेमध्ये तीसरा क्रमांक -NNL

third rank in Abacus exam : पलाशा संजय नलावडे हिने मिळविला अबॅकस परीक्षेमध्ये तीसरा क्रमांक -NNL

करियर, नांदेड
नांदेड| पलाशा संजय नलावडे हिने इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथीनीने अबॅकस परीक्षेमध्ये तीसरा क्रमांक मीळवला आहे. या यशाबद्दल सर्व शीक्षक आणि पालकांनी तिचे अभिनंदन केले आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव या ठिकाणी पलाशा संजय नलावडे हि शिक्षण घेत असून, आत्तापर्यंत तिने शिक्षण क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे. श्रीमती कावेरी देशमुख, तेजन नागेशराव देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन तीचे अभिनंदन केले. तर साई संजयराव जमदाडे, प्रणव जमदाडे यांनी चॉकलेट गिफ्ट दिले, तसेच कु.पलाशा नलावडे हिस वर्षा जमदाडे यांनी अनेक शुभ आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या आहेत. सौ ज्योती, डॉक्टर संजय नलावडे, कु. चिराग नलावडे यांनी देखील अभिनंदन केले आहे....
Taluka level science exhibition : बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले -NNL

Taluka level science exhibition : बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील  महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात विभागाच्या वतीने आयोजित 52 वे तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2024-25 बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले. बालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरित्या पार पडले.        पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड, विस्तार अधिकारी(पंचायत) , कैलास गायकवाड विस्तार अधिकारी (शिक्षण) बालाजी मोकळे, संजय कराड, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.      या प्रदर्शनामध्ये माध्यमिकचे 11 व प्राथमिक विभागाचे 37 असे एकूण 48 प्रकल्प सामील झाले होते. या पैकी प्राथमिक गटातून  शुभम शिवाजी मोरे (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा) याच्या विद्...
Devidas Phulari : देविदास फुलारी यांची शिरूर अनंतपाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड -NNL

Devidas Phulari : देविदास फुलारी यांची शिरूर अनंतपाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड -NNL

करियर, नांदेड
नांदेड| साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ शिरूर अनंतपाळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक , समीक्षक, कवी देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे . फुलारी यांना आज साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने अध्यक्ष पदाचे निमंत्रण पत्र देण्यात आले आहे. मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या अनेक साहित्यकृती देविदास फुलारी यांनी दिले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, समष्टीच्या कल्याणाचा विचार पेरणाऱ्या देविदास फुलारी यांनी साहित्य चळवळीला दिलेले योगदान अतुलनीय असेच राहिले आहे. त्यांच्या या साहित्य सेवेमुळे महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोरया लॉन्स शिरूर आनंदपाळ येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देविद...
Warm support given to orphan : हु. ज. पा. कॉलेजच्या २००३ बॅचची २० वर्षांनंतर पुनर्भेट; सामाजिक उपक्रमाद्वारे अनाथ मुलींना दिला उबदार आधार -NNL

Warm support given to orphan : हु. ज. पा. कॉलेजच्या २००३ बॅचची २० वर्षांनंतर पुनर्भेट; सामाजिक उपक्रमाद्वारे अनाथ मुलींना दिला उबदार आधार -NNL

नांदेड, करियर
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटिल महाविद्यालय हिमायतनगर येथील बॅच २००३ विज्ञान शाखेचे माजी विद्यार्थी विद्यार्थ्यानी रियुनियन-२०२४ सोहळ्याच्या माध्यमातून २० वर्षानंतर एकत्र आले. नांदेड येथील हॉटेल चतुर्थी च्या सभागृहात हा स्नेह भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी मोठ्या संख्येने रियुनियन-२०२४ या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते आणि "२० वर्षानंतरही मैत्रीचे नाते हे महत्वाचे आहे..!" हे सोहळ्याचे ब्रीद वाक्य सत्यात उतरवले. हुतात्मा जयवंतराव पाटिल महाविद्यालयाची विज्ञान शाखेची २००३ ची बॅच ही एक यशस्वी बॅच म्हणून परिचित आहे. या बॅच चे विद्यार्थी विद्यार्थ्यानी हे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, मोठे व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, शिक्षक-शिक्षिका बनून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत आहेत. पण दैनंदिन जीवनातून वेळ काढून...
Hard Success ; “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल – प्रा. नितीन बानूगडे पाटील –

Hard Success ; “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल – प्रा. नितीन बानूगडे पाटील –

करियर, नांदेड, लातूर
नांदेड/लातूर। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा पाया रचणाऱ्या आयआयबी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट च्या वतीने आयोजित "विजयी भव:" हा प्रेरणादायी कार्यक्रम प्रचंड उत्साहाने पार पडला. विद्यार्थ्यांना ताणतणावमुक्त शिक्षणाची प्रेरणा देण्यासाठी आणि एमबीबीएस प्रवेशाच्या तयारीसाठी दिशा दाखवण्यासाठी आयआयबीने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करतांना प्रबोधनकार व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी "विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांसमोर केले. आयआयबी: एमबीबीएस प्रवेशासाठी विश्वासार्ह मार्गदर्शक - आयआयबी ही संस्था विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणातील यशाचा पाया घालण्यासाठी ओळखली जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे मार्गदर्शन, आणि त्यांच्या यशासाठी आवश्यक सर्व प्रकारचे शैक्षणिक सहाय्य पुरवणे यासाठी आय...
Kishorkumar wagadarikar ; स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जल जीवन मिशन चे राष्ट्रीय प्रशिक्षक किशोरकुमार वागदरीकर यांचा सत्कार -NNL

Kishorkumar wagadarikar ; स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जल जीवन मिशन चे राष्ट्रीय प्रशिक्षक किशोरकुमार वागदरीकर यांचा सत्कार -NNL

नांदेड, करियर
नांदेड।  देशाच्या विविध राज्यात स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जलजीवन मिशन या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षक म्हणून गावो-गावी महाराष्ट्र, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल,गुजरात, मध्यप्रदेश,जम्मू कश्मीर,झारखण्ड,उत्तराखंड, राजस्थान इ.विविध राज्यात जनजागृति करण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. त्याबरोबरच 2015-16 साली दरम्यान लाल बहादुर शास्त्री प्रशासनिक अकादमी,मसूरी उत्तराखंड येथे आईएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी यांना त्यांनी स्वच्छ भारत मिशन समुदाय संचलित संपूर्ण स्वछता विषयी (CLTS) अंतर्गत त्यांनी प्रशिक्षण दिले होते.त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात किशोरकुमार वागदरीकर यांचा सन्मान केला. ...
Ram Tarate ; उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे ; साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम -NNL

Ram Tarate ; उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे ; साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम -NNL

करियर, नांदेड
नांदेड। शालेय जीवनातील वक्तृत्व कलेचा विकास होण्यासाठी कथाकथन हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम असते. साने गुरुजी कथा मालेतून अशा प्रतिभावान कथा कथन करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख तयार होते. तसेच यामधून विद्यार्थ्यांच्या उत्तम वक्तृत्व शैलीचा विकास होतो आणि व्यक्तिमत्त्वालाही आकार येतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार राम तरटे यांनी केले. ते साने गुरुजी कथामाला हेलस आयोजित, नांदेड जिल्हा कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शहरातील प्रियदर्शनी विद्या संकुल येथे अत्यंत देखण्या आणि भव्य स्वरूपात जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पद्माकर कुलकर्णी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, प्रियदर्शिनीचे अध्यक्ष बालासाहेब माधसवाड, विलास कोळनूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना व्...
Scholership ; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) संपन्न -NNL

Scholership ; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) संपन्न -NNL

करियर, नांदेड
नांदेड, माणिक भिसे। इयत्ता आठवीसाठी लिटल फ्लॉवर कॉन्व्हेन्ट स्कूल, बिलोली येथे रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली. सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून श्री. काळे जयवंत संभाजीराव यांनी उत्तमरित्या नियोजन करून आपली भूमिका पार पाडली. शनिवारी परीक्षेच्या पहिल्या दिवशी बिलोली तालुका गटशिक्षणाधिकारी श्री.बी. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाप्रमाणे सर्व पर्यवेक्षक शिक्षक यांची सभा घेऊन सर्वांना परीक्षेबाबत सूक्ष्म सूचना देण्यात आले. सदर परीक्षेसाठी बिलोली तालुक्यातून 339 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी 332 विद्यार्थीनी परीक्षा दिली व अनुपस्थित विद्यार्थी एकूण 7 होते. उपस्थित विद्यार्थी शेकडा प्रमाण 97.93% होते. एकूण 15 हॉलमध्ये 15 पर्यवेक्षका मार्फत परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी बिरमवार जी.बी. यांनी भेट देऊन परीक्षा सुरूळीत सुरू असल...
No Plastic : जि.प. शाळेच्या चिमुकल्यांचे ‘नो प्लास्टिक’ अभियान संत गाडगेबाबा यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन -NNL

No Plastic : जि.प. शाळेच्या चिमुकल्यांचे ‘नो प्लास्टिक’ अभियान संत गाडगेबाबा यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वच्छतेचे पुजारी, लोकशिक्षक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त जवळा दे. येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय व गाव परिसर स्वच्छता करून गाडगेबाबांना कृतीशील अभिवादन करण्यात आले. तसेच परिसरात 'नो प्लास्टिक' अभियान राबवून गाडगेबाबांना आदरांजली वाहिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशन गच्चे, माजी सरपंच कैलास गोडबोले, माजी सरपंच साहेबराव शिखरे, हैदर शेख, पांडुरंग गच्चे, मनिषा गच्चे, कमलबाई गच्चे, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, इंदिरा पांचाळ, धम्मपाल गोडबोले, मिलिंद गोडबोले आदींची उपस्थिती होती. स्मृतीदिनाच्या औचित्याने मुख्याध्यापक ढवळे यांनी स्वच्छतेचे मानवी जीवनाताली महत्त्व विशद केले. अभियानाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालय व शाळेत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिम...
error: Content is protected !!