किनवट, परमेश्वर पेशवे। एकलव्य मॉडेल रेसिंडीयल विद्यालय सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांनी इगतपुरी नाशिक येथील राज्यस्तरीय कला उत्सव 2024 मध्येयश संपादन केले असून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आदिवासी शिक्षा छात्र समिती दिल्ली NESTS स्तरावरून दरवर्षी जिल्हा राज्य देशपातळीवरील कला उत्सव आणि ज्ञान उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते त्याच अनुषंगाने दिनांक 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान एकलव्य विद्यालय सहस्त्रकुंड येथील जिल्हास्तर कला उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.


ज्यामध्ये एकूण सहा ते सात जिल्ह्यातील एकलव्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून एकलव्य विद्यालय सहस्त्रकुंडच्या विद्यार्थ्यांची निवड बऱ्याच कला प्रकारात राज्यपातळीवरील नाशिक येथील कलह उत्साह करिता झाली होती. त्यामधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी इगतपुरी नाशिक येथे राज्यकला उत्साह पारंपरिक कथा, वकृत्व, भाषण ,तालवाद्य प्रस्तुती प्रकारात प्रथम स्थान प्राप्त करून भुवनेश्वर ओडीसा येथे होणाऱ्या देशपातळीवरील कला उत्साहात भरारी घेतली आहे.

यामध्ये पारंपरिक कथा प्रकारात इयत्ता नववीची पूजा बेले, इयत्ता दहावीचा सिद्धांत लोखंडे, वकृत्वामध्ये दहावीची प्रियांका उपोड व तालवाद्य प्रस्तुतीमध्ये दहावीचा यश मुगाची ढोले यांनी पारितोषिक प्राप्त केले .विजेत्याचे कौतुक श्रीमती नयना गुंडे कमिशनर, श्रीमती वनिता सोनवणे सा. कमिशनर, जितेंद्र चव्हाण एटीसी अमरावती, श्रीमती मेघना कावली पीओ किनवट, श्रीमती अनिता दाभाडे आदींनी केले.

त्या सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाच्या प्राचार्य राधिका गोलटकर मॅडम,संगीत अध्यापक ज्ञानेश्वर डांगे ,निर्मल, ममता जाधव, दीक्षा मॅम, सुरेश इंगळे, वर्षा वाघमारे, सुखिंदर सर, प्रिन्स सर, विशाल सर, सोनू सर बरीरा मॅम ,अपर्णा मॅम, सुमन मॅम ,राखी मॅम, स्नेहल मॅम, एम बी शिंदे, कनाके, ढोले सर सत्येंद्र सर ,सामंत ,अमन सर देव सुमित सर आदिना देतात.
