HomeनांदेडYatra Festival ; केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा यात्रा महोत्सवात सन्मान - NNL

Yatra Festival ; केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा यात्रा महोत्सवात सन्मान – NNL

उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट, भरीव कामगिरी करणाऱ्या जयवंतराव काळे यांचा जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते मानवस्त्र , स्मृती चिन्ह व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या हर्ष उल्हासात श्री भीमाशंकर महाराज यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा पार पडला. दररोज भजन कीर्तन, प्रवचन याचे आयोजन करण्यात आले. तर ११ ऑक्टोबर रोजी रात्री गावातील गुणवंत विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते , पुरस्कार विजेते यांचा जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्री भीमाशंकर महाराज यांच्या यात्रा महोत्सवात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील वर्ष २०२३-२०२४ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या राबविण्यात आलेल्या ” मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा ” या उपक्रमात भाग घेऊन जि.प. कें. प्रा. शाळा शिराढोण या शाळेचा कंधार तालुक्यातून पहिला क्रमांक मिळविला होता. त्यांच्या कार्याची व तळमळीने केलेल्या कार्याची दखल घेऊन शिराढोण यात्रा महोत्सव समितीने जयवंतराव काळे ( केद्र प्रमुख पं.स. बिलोली ) यांचा उपस्थित महाराज व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते मानवस्त्र, स्मृती चिन्ह व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments