HomeनांदेडChikhlikar ; विजया दशमी दसरा निमित्ताने वैजनाथ देशमुख यांनी रावण दहन सोहळा...

Chikhlikar ; विजया दशमी दसरा निमित्ताने वैजनाथ देशमुख यांनी रावण दहन सोहळा सातत्य ठेवुन केलेले कार्य उल्लेखनीय , माजी खा‌.चिखलीकर – NNL

नवीन नांदेड l विजया दशमी निमित्ताने रावण दहन करण्याचे सातत्य कायम ठेवुन भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून खासदार या नात्याने सार्वधिक विकासासाठी सिडको हडको सह शहरासाठी विकास निधी दिला असल्याचे‌ माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

सतत पाच वर्षांपासून व‌ याही वर्षी विजया दशमी दसरा निमित्ताने हडको परिसरातील वाघाळा पाटी नजीक आयोजक तथा नांदेड शहर भाजपा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने हिंगोली येथील कलाकार रवी ऊसांडे यांच्या वतीने करण्यात आलेल्या १२ ऑक्टोबर रोजी ३१ फुट दहा तोंडी रावणाचे दहन माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या‌ सह मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी भाजपा शहर महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,‌प्रविण साले,जनार्दन ठाकुर,‌‌ डॉ.सचिन ऊमरकेर,जिवन‌ पाटील‌ घोगरे,माजी नगरसेवक राजु गोरे, बंटी मल्होत्रा,विश्वंभर शिंदे,सौ.बेबीताई जनार्दन गुपीले,माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड,‌ माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, सचिन‌ रावका, सुरेश लोट,राजन जोजारे,‌ कल्याण येजगे,महेंद्र तरटे,‌ विजयाताई गोडघासे, गजानन कळकेकर, प्रविण काळे, प्रा.मधुकर गायकवाड ,भाजपा पक्षाचे विविध आघाडी पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा रावण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

‌ यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी‌ गेल्या वर्षात खासदार या नात्याने सिडको हडको सह परिसरातील ग्रामीण भागात सार्वधिक विकासासाठी निधी दिला असल्याचे सांगून यापुढे ही विकासा साठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रविण साले ,दिलीप कंदकुर्ते, सौ.बेबीताई गुपीले, नरेंद्र गायकवाड यांच्यी मार्गदर्शन पर भाषणे झाली.

आयोजक तथा ‌भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन धिरज स्वामी,दिंगाबर शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैजनाथ देशमुख मित्र मंडळ यांनीपरिश्रम घेतले.प्रारंभी बंडा रवंदे प्रस्तुत रसिका तुझ्या साठी या संचाने मराठी व हिंदी भागवित गिते सादर केली.‌ या सोहळ्याला सिडको हडको सह ग्रामीण भागातील महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments