नवीन नांदेडl नांदेड शहरातील वग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने स्थापन केलेल्या सार्वजनिक दुर्गा मातांचे १३ ऑक्टोबर रोजी ढोलताशांच्या गजरात दांडीया खेळत महिला भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्य मार्गावरून जय माता की,जोरसे बोलो जय माता की घोषणा देत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वपोलीस प्रशासन यांच्या संयुक्त ऊप्रकमाने झरी खदान येथे क्रेनचा सहाय्याने जिवरक्षक दलाच्या मदतीने विसर्जन करण्यात आले.


नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा मातांचे विसर्जन झरी खदान येथे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे ,ऊपअभियंता अरूण शिंदे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक मारोती सारंग, मालु एनफळे, विठ्ठल अंबटवार, नथुराम चवरे, यांच्या सह जिवरक्षक दलाच्या सहाय्याने व क्रेनचा मदतीने विसर्जन करण्यात आले, यावेळी स्वच्छता निरीक्षक अरजृन बागडी , यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई कर्मचारी यांनी परिसरात सफाई अभियान राबविले.


यावेळी मनपा आयुक्त,व अतिरिक्त आयुक्त यांनी भेट देऊन पाहणी केली तर पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक,ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, यांच्या सह वरीष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन झरी खदान पाहणी केली आहे. नांदेड शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्ती नवीन पुल,गोवर्धन घाट,नाव घाट मार्गे विष्णुपुरी प्रमुख रस्त्यावरून नानकसर गुरूद्वारा मार्ग झरी खदान येथे आणण्यात आल्यानंतर विधीपूर्वक पूजा व महाआरती नंतर विसर्जन करण्यात आल्या. मनपा व पोलीस प्रशासन यांच्या तर्फे नवरात्रोत्सव मंडळ पदाधिकारी यांच्ये स्वागत करण्यात आले.
