Shri Durga Mata ; नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्ये उत्साहात मुर्ती विसर्जन – NNL
नवीन नांदेडl नांदेड शहरातील वग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने स्थापन केलेल्या सार्वजनिक दुर्गा मातांचे १३ ऑक्टोबर रोजी ढोलताशांच्या गजरात दांडीया खेळत महिला भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्य मार्गावरून जय माता की,जोरसे बोलो जय माता की घोषणा देत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वपोलीस प्रशासन यांच्या संयुक्त ऊप्रकमाने झरी खदान येथे क्रेनचा सहाय्याने जिवरक्षक दलाच्या मदतीने विसर्जन करण्यात आले.
नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा मातांचे विसर्जन झरी खदान येथे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे ,ऊपअभियंता अरूण शिंदे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, सिडको क्षेत्र...
