नवीन नांदेडl नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको बालाजी मंदिर येथे ३४ वा तर हडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे २२ व जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी विकास नगर जुना कौठा येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चौदाव्या ब्रम्होत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आले होते , विजया दशमी निमित्ताने १२ ऑक्टोबर रोजी सकाळ पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन घेतले, यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आजी माजी लोकप्रतिनिधी सह जेष्ठ नागरिक यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहा मध्ये कौठा, सिडको, हडको बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्त्सव साजरा करण्यात आला असून, तीन आक्टोंबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत दैनंदिन सकाळी व संध्याकाळी यजमान यांच्या हस्ते महाआरती तर सायंकाळी पालखी परिक्रमा उत्सव दैनंदिन साजरा करण्यात आला,तर बालाजी मंदिर हडको येथे कल्याण उत्सव मध्ये बालाजी पद्मावती लक्ष्मी विवाह सोहळा आ.मोहनराव हंबर्डे व मुख्य यजमान पिल्ले यांच्या उपस्थित संपन्न झाला.कौठा येथील बालाजी मंदिरात रथयात्रा १२ आक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ मिरवणूक,व सायंकाळी ७.३० वाजता २५ फुट रावण दहन मंदीराच्या प्रागणांत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड भाजपा महानगर शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी नगरसेवक राजु काळे, राजु गोरे व मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता.

या ब्रमहोत्सव चे आयोजन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगरचे संस्थापक अध्यक्ष विजय कुमार पवार, कार्यकारी अध्यक्ष उद्धवराव बसवदे पाटील,सचिव देवदत्त देशपांडे ,सहसचिव बाबाराव इबितवार, कोषाध्यक्ष उत्तमराव भाले ,सदस्य ॲड. गणेश कीर्तने, साई प्रसाद वरपडे ,गंगाधर बडवणे, हनमल्लु शकरवार, लक्ष्मीकांत मुक्कावार, कुमार लाल वाणी, पुरूषोतम सोनी,संजय भालके व सर्व समित्या प्रमुख समस्त विकास नगर यांनी परिश्रम घेतले.

हडको येथील श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे विजया दशमी दसरा निमित्ताने माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,भाजपा शहर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या सहआजी माजी पदाधिकारी, नागरिक यांनी दर्शन घेतले , तर ब्रम्होत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी अध्यक्ष अरुण दमकोडंवार, उपाध्यक्ष गोवर्धन बियाणी,सचिव बि.आर.मोरे,यांच्या सह माणीकराव देशमुख,किशोर देशमुख,चंद्रशेखर चव्हाण, विवेकानंद देशमुख,बाबुराव येरगेवार, करणसिंग ठाकुर, संतोष वर्मा,संजिवन राजे,अजय भंडारी, प्रकाशसिंह परदेशी,सचिन नपाते,यांनी परिश्रम घेतले.

सिडको येथील भगवान बालाजी मंदिर संस्थान येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ब्रम्होत्सव काळात दैनंदिन पालखी परिक्रमा आयोजन करण्यात आले तर कल्याण उत्सव १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला तर ११ रोजी रथयात्रा काढण्यात आली,यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शन घेतले, ब्रम्होत्सव सोहळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष साहेबराव जाधव,डॉ.नरेश रायेवार,व्यंकटराव हाडोळे,बाबुराव बिरादार, तुकाराम नांदेडकर,वैजनाथ मोरलवार, रामचंद्र कोटलवार, गोविंद सुंकेवार, पुंडलिक बिरादार,यांच्या सह पदाधिकारी व उत्सव समिती यांनी परिश्रम घेतले.