HomeनांदेडOn the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या...

On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर शहरातील श्री परमेश्वर मंदिरापासून सघोष पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. यात मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

IMG 20241013 080222 On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात सकाळी ०८ वाजता प्रथम वाद्याच्या गजरात रंगीत तालीम घेण्यात आली. यानंतर प्रार्थना होऊन पथसंचालनाची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. गावातील महिलांनी सकाळी सडा – सारवान व रांगोळी काढून पथसंचालनाच्या स्वागताची तयारी केली होती. शोभायात्रेत युवकांनी संघाचे गणवेश धारण करून हाथी भगवा ध्वज व लाठी धरून सघोष शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन शहरातील मुख्य रस्त्याने केले.

IMG 20241013 081026 On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

संचालनानंतर श्री परमेश्वर मंदिरात डॉ हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि शस्त्राचे पूजन करन्यात आले. प्रांत संघटन मंत्री व मान्यवरांचे बौद्धिक भाषण झाले. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी स्वतः आणि सहकार्यांना घेऊन उपस्थित होऊन बंदोबस्त लावला.

IMG 20241013 081054 On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

IMG 20241013 080128 On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

IMG 20241013 081014 On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments