नांदेड। राज्यसभेत दि. 29.07.2024 रोजी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या नांदेड विमानतळाच्या विकासासंदर्भातील विशेष उल्लेखावर केंद्रीय नागर विमान राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोळ लक्ष देत आहेत. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागास दिले आहेत.


नांदेड विमानतळ हून नांदेड ते अहमदाबाद, हिंडन, बंगळुरू आणि हैदराबाद या मार्गांवर 31.03.2024 रोजी आणि नांदेड ते नागपूर आणि पुणे या मार्गांवर 27.06.2024 रोजी 76-आसनी विमानाच्या माध्यमातून उड्डाणे सुरू केली आहेत. RCS मार्ग नांदेड ते न्यू गोवा (MOPA), गोवा, पाटणा आणि आदमपूर या मार्गांचे उड्डाण 5.0 अंतर्गत वाटप करण्यात आले आहे, जी लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.


खा. गोपछडे यांनी नांदेड येथे MRO सुविधा आणि फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (FTO) स्थापनेबाबत राज्यसभेत मागणी केली होती. सरकारची या संदर्भातील भूमिका खाजगी क्षेत्राला विविध धोरणे, नियम व इतर प्रोत्साहनांद्वारे सुविधा पुरविण्याची आहे. सरकार कोणतीही सुविधा स्वतः स्थापित करत नाही. DGCA मध्ये नांदेड येथे MRO सुविधा किंवा FTO स्थापन करण्यासाठी अद्याप कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही. एकदा असा अर्ज प्राप्त झाल्यास, DGCA नियम व मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक मंजुरीसाठी त्यांचे योग्य प्रकारे विमान मंत्रालय परीक्षण करेल, असे पत्राद्वारे कळविले आहे. नांदेड विमानतळ विकासासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयतत्नास प्रतिसाद मिळत आहे.
