श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात माहूर तालूक्यातील जि. प.उ.,प्रा,शाळा, ईवळेश्वर येथील पदविधर शिक्षक संजय बापूराव खडकेकर यांना दि.४ ऑक्टोबर रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन-२०२२ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल (भा. प्र.से.) यांच्या हस्ते खडकेकर यांना सपत्नीक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व ग्रंथ असे होते.


यांच्या संपूर्ण विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक राष्ट्रीय कार्यातील असधारण योगदानाप्रीत्यर्थ तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील, निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्माती, शैक्षणिक व्हीडीओ निर्माती, विदयार्थ्यांना मार्गदर्शन यासह असंख्य भरीव योगदानासाठी यांना गौरविण्यात आले. या वेळी मंचावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे हे उपस्थित होते.

खडकेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी मिळालेल्या या पुरस्कारासाठी , गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया,राजू मुधोळकर केंद्र प्रमुख विनोद सूरोशे, शिवराज पाटील,धनाजी मुंडकर, संजय मगरे, ज्ञानेश्वर मानीककामे ,नारायण शिंदे, सतीष वाघमारे, संतोष चव्हाण,डि.डि.चव्हाण,यासह अनेकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
