Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात माहूर तालूक्यातील जि. प.उ.,प्रा,शाळा, ईवळेश्वर येथील पदविधर शिक्षक संजय बापूराव खडकेकर यांना दि.४ ऑक्टोबर रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन-२०२२ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल (भा. प्र.से.) यांच्या हस्ते खडकेकर यांना सपत्नीक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व ग्रंथ असे होते.
यांच्या संपूर्ण विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक राष्ट्रीय कार्यातील असधारण योगदानाप्रीत्यर्थ तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील, निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्माती, शैक्षणिक व्हीडीओ निर्माती, विदयार्थ्या...
