हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रविवारी भेट दिली आणि प्रश्नाला पुन्हा नागरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास होणार नाही यासाठी जातीने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.


हिमायतनगर शहर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर शहराला महापुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे नाल्याच्या काठावरील व सखल भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने शहरातील वॉर्ड क्रमांक 1, 13 व 16 मधील नागरिकांचे मोठं नुकसान झाला आहे. त्यामुळे अनकेन रात्र जागून काढावी लागली असून, किनवट दौऱ्यावर जात असताना हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली.



या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या. त्यानंतर तातडीने मदत व उपाययोजना करण्यासाठी खासदारांनी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी सौ.पल्लवी टेमकर यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष संजय काईतवाड, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, बाळू अण्णा चवरे, अमोल धुमाळे, संदीप तुप्तेवार, चंद्रकलाबाई गुड्डेटवार आदींसह अनेक कार्यकर्ते नागरिक तहसील व नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.




