HomeनांदेडLeopard dies due to electric shock : हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात विजेचा...

Leopard dies due to electric shock : हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात विजेचा शाॅक लागून बिबट्याचा मृत्यू

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात भक्ष्य शोधण्यासाठी आलेल्या बिबट्याचा विजेचा शाॅक लागून मृत्यू (Leopard dies due to electric shock) झाला आहे. हि घटना दिनांक ४ मंगळवार सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान वनविभागाने घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील वाशी भागात चांगल्या प्रकारे जंगल अस्तित्वात आहे. या जंगलात बिबट्याचे नेहमी वास्तव्य असते. जंगलांतून खाली वाहत येणाऱ्या एका ओढ्याने भुकेने व्याकूळ बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी खाली येत असताना, त्यास एका झाडावर वानरांचा कळप दिसला. त्याच क्षणी त्यांने झाडांवर चढून एका वानरांच्या पिल्लास भक्ष्य केले. तेच भक्ष्य जबड्यात पकडून, बिबट्या झाडावरून खाली उतरत असताना त्याचा झाडाशेजारील लागून असलेल्या ११ केव्ही विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने बिबट्यास विजेचा जबरदस्त शाॅक लागला.

Lapro Leopard dies due to electric shock : हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात विजेचा शाॅक लागून बिबट्याचा मृत्यू

या घटनेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. बिबट्याने ज्या वानरांच्या पिल्लाला भक्ष्य केले होते. त्या वानराच्या पिलाचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहीती मिळताच जिल्हाउपवन संरक्षक केशव वाबळे, सहाय्यक उपवनसंरक्षक ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अमोल कदम, वनरक्षक वानोळे, वनमजूर शेख अहेमद हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मयत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र येवतीकर, डाॅ. उमेश सोनटक्के यांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनानंतर अंतिमसंस्काराचा सोपस्कार स्थानिक वनविभागाने पुरा केला.

IMG 20250205 WA0021 Leopard dies due to electric shock : हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात विजेचा शाॅक लागून बिबट्याचा मृत्यू

सध्या जंगलातील सर्वच ठिकाणाच्या नैसर्गिक पाणवठ्याचे बाष्पीभवन झाले असल्याने वन्य प्राण्यांना जंगलात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्याकरिता वनविभागाने महत्त्वपूर्ण उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे. प्राथमिक स्वरूपात सदर बिबट्याचा मृत्यू हा विजेचा शाॅक लागून झाला असे सांगण्यात येते आहे. परंतू जंगलातील ए. ग्रेडचा प्राणी हा बिबट्या असल्याने या बिबट्याचा मृत्यूचे कारण शोधणे अतिशय गरजेचे असून वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे. अशी मागणी वन्यप्रेमी जनतेतून केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments