Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Dr. Pradeep Jadhav ; जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचा वतीने आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांच्या कर्तृत्वाचा गौरव

Dr. Pradeep Jadhav ; जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचा वतीने आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांच्या कर्तृत्वाचा गौरव

नांदेड, करियर
नविन नांदेड l सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडकोच्या वतीने आफ्रिका खंडातल्या मालावी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉ.प्रदीप नानासाहेब जाधव यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार सोहळा 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव तर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शांतादेवी जाधव, कोषाध्यक्ष ॲड.प्रा.श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ.वसीयोद्दीन मुजावर, यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप जाधव यांनी मालवी या देशातील ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरातील प्रसिद्ध एल. एम. जे. हॉस्पिटलच्या वतीने कार्डिओलॉजी अँड सर्जरीसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात पोट विकाराच्या विविध १४ ...
Excellence Award : ‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे देण्यात येणारे २०२३-२४ चे ‘उत्कृष्ट पुरस्कार’ जाहीर

Excellence Award : ‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे देण्यात येणारे २०२३-२४ चे ‘उत्कृष्ट पुरस्कार’ जाहीर

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २०२३-२४ या वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ दि. ३० जानेवारी रोजी दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. २०२३-२४ या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार (Excellence Award) झरी (परभणी) येथील सूर्यकांतराव देशमुख (कांतराव काका झरीकर) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जानेवारी रोजी स. ११:०० वा. महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे असणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कळविले आहे. कांतराव काका झरीकर यांना महाराष्ट्र शासनाने कृषी-भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कृषी, जलसंधारण, कृषीपूरक उद्योग क्षेत्रात...
Minister Atul Save : ‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – ना. अतुल सावे

Minister Atul Save : ‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – ना. अतुल सावे

नांदेड, करियर
नांदेड| भोकर मतदार संघातील युवकांसाठी श्रीजया चव्हाण यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. युवा उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन युवकांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी व्यक्त केली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित युवा उमेदवार नावाच्या फेसबुक पेजच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलवार,आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार झाल्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी पहिल्याच महिन्यात त्या कामाला ...
Dr. Nanasaheb Jadhav ; स्नेहसंमेलनातूनच भावी कलावंतांची जडणघडण – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव

Dr. Nanasaheb Jadhav ; स्नेहसंमेलनातूनच भावी कलावंतांची जडणघडण – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांतूनच भविष्यातील असंख्य कलावंतांची जडणघडण होत असते म्हणून स्नेहसंमेलनातील विविध सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सक्रिय राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी केले. वसंतराव नाईक महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन, पारितोषिक वितरण आणि समारोप कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी झी मराठी - 'चला हवा येऊ द्या फेम' सतीश कासेवार, प्रख्यात गायिका शीतल अभ्यंकर यासारख्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनातून आपले सुप्त कौशल्ये विकसित असे गौरव उद्गार यावेळी डॉ.नानासाहेब जाधव यांनी काढले. या प्रसंगी डॉ.नानासाहेब जाधव यांनी उपस्थित विद्या...
Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : पात्र नवमतदारांनी उत्साहाने मतदार यादीत नावे नोंदवावी – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : पात्र नवमतदारांनी उत्साहाने मतदार यादीत नावे नोंदवावी – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

नांदेड, करियर
नांदेड| ज्या तरुण-तरुणींनी 1 जानेवारी 2025 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांनी अत्यंत उत्साहाने आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. तसेच आपल्या मित्रांना सुध्दा मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर (Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar) यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वरकड, निवडणूक नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू, नायब तहसीलदार इंद्रनील गरड यांच्यासह जिल्ह्यातील बीएलओची उपस्थिती होती. कुलगुरु डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, सशक्त लोकशाही ही मतदार व मतदान या दोन बाबींवरच अवलंबून असते. तसेच मतदान करणे हे प्र...
Annual Snehamelan : अनुसूचित जाती मुलीची शासकीय निवासी शाळा माहूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन

Annual Snehamelan : अनुसूचित जाती मुलीची शासकीय निवासी शाळा माहूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर| सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत सुरू असलेली अनुसूचित जाती मुलीची शासकीय निवासी शाळा माहूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Snehamelan) शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड, यांच्या मार्गदर्शनाखाली दि २४ जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन जोशी मुख्याध्यापक होते, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनोज कीर्तने, विलास भंडारे, राज ठाकूर, नितेश बनसोडे, देवानंद कांबळे, श्रीमती नम्रता कीर्तने, श्रीमती ढवळे , अविनाश टनमने, भाग्यवान भवरे, एकनाथ मानकर, यशवंत साबळे, हे मान्यवर उपस्थित होते, यावेळी ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी व आदिवासी बंजारा व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव, नाटिका व नृत्य सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे आई-वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमत...
A Police Officer Awarded ; नांदेड पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी व एक पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती पदक

A Police Officer Awarded ; नांदेड पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी व एक पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती पदक

करियर, नांदेड
नांदेड। पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी पोउपनि संजय आंबादास जोशी, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड व पोहेकॉ. दिलीप भोजुसिंग राठोड, पोस्टे भाग्यनगर, नांदेड यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पोउपनि संजय आंबादास जोशी, पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड येथील रहिवासी असुन महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक 03.05.1991 रोजी पोलीस अंमलदार म्हणुन सेवेत हजर झाले. त्यांनी तामसा, कंधार, भाग्यनगर, एसीबी, पीसीआर, पीसीडब्ल्युसी, सध्या नियंत्रण कक्ष येथे पोउपनि म्हणुन कर्तव्यावर हजर आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांना आज पावेतो एकुण 220 बक्षिस मिळाले असुन 1 मे 2021 रोजी डि.जी. इनसिगनीया हे पदक मिळाले आहे. पोहेकॉ. दिलीप भोजुसिंग राठोड, पोस्टे भाग्यनगर, नांदेड हे मुळचे मौजे किन्हाळा ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवासी असुन, महाराष्ट्र पोलीस दलात दिनां...
Dr. Shankar Vibhute ; त्यागाशिवाय माणूस विकसित होत नाही – डॉ. शंकर विभुते

Dr. Shankar Vibhute ; त्यागाशिवाय माणूस विकसित होत नाही – डॉ. शंकर विभुते

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयावर विशेष वार्षिक शिबिर मौजे गुंडेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे 21 जानेवारीपासून ते 27 जानेवारी पर्यंत संपन्न होत आहे. या शिबिराच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात डॉ शंकर विभुते यांनी त्यागाशिवाय माणूस विकसित होऊ शकत नाही असे उद्गागार काढले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ दिलीप काठोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भागवत पस्तापुरे व्यासपीठावर प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, प्रा‌.डॉ.सत्वशीला वरघंटे, गावचे सरपंच हंबर्डे यांची उपस्थिती होती तसेच डॉ शंकर विभुते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रश्न पडणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. सद्यस्थितीत नवनिर्मिती होताना दिसत ना...
Online Admit Card of 10th Exam : दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचना

Online Admit Card of 10th Exam : दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचना

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात आले आहे की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉलतिकिट) (Online Admit Card of 10th Exam) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉलतिकिट) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार 20 जानेवारी पासून Admit Card या लिंकव्दारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. ऑनलाईन प्रवेशपत्रे (हॉलतिकिट) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व वि...
10th-12th exam admit card : दहावी-बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र नव्याने ऑनलाईन उपलब्ध  

10th-12th exam admit card : दहावी-बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र नव्याने ऑनलाईन उपलब्ध  

करियर, नांदेड
नांदेड| फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) नव्याने 23 जानेवारी पासून तर इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून उपलब्ध (10th-12th exam admit card newly available online) करून देण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य-शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिन देविदास कुलाळ यांनी केले आहे. मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या इयत्ता 12 वी प्रवेश पत्रांवर (हॉलतिकीट) जातीचा प्रवर्ग या कॉलमची छपाई करण्यात आली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवेशपत्रांवरील (हॉल तिकीट) सदरचा जातीचा प्रवर्ग कॉलम रद्द केला असून विद्यार्थ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहणार आहे. नव्याने...
error: Content is protected !!