नांदेड| आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतली असता बघ्यापैकी कुणीही मदतीला जात नव्हते. अश्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन समोर असलेल्या बेकरी व आजुबाजूला असलेल्या घरातुन बकेटमध्ये पाणी घेऊन आग विझवित आगीमुळे निर्माण होणारा पुढील अनर्थ टळला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे नेमणुकीस असलेले सुधीर भालचंद्र खोडवे यांनी दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 07.30 वा. चे सुमारास नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतला असता बघ्याची गर्दी जमली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे, हे तिथुन जात असतांना त्यांनी जमलेली गर्दी पाहुन सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन क्रमांक एमएच- 20 / ईई – 7982 ही जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही मदतीला जात नव्हते.
अशावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन समोर असलेल्या बेकरी व आजुबाजूला असलेल्या घरातुन बकेटमध्ये पाणी घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे आग बघणारे अनेक जण होते कांही तर मोबाईलमध्ये शुटींग करीत होते परंतु कोणीही ही आग विझविण्याकरीता धावुन आले नाही. आगीमुळे निर्माण होणारा पुढील अनर्थ टळला आहे. त्यांनी यापुर्वी सुध्दा उत्तम कामगीरी केली आहे.
त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरीमुळे त्यांनी केलेले हे कार्य निश्चितच प्रशंसनीय असून, पोलीस दलाचे नावलौकीक वाढवणारे आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देवुन सन्मान केला आहे.अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. अश्विीनी जगताप, गृह पोलीस अधीक्षक नांदेड यांनी त्यांचे उत्कृष्ट कामगीरी बदल कौतुक केले आहे.