नांदेड। नांदेडच्या पवित्र भूमीत श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या नावाने मागील 51 वर्षापासून सुरु असलेल्या “श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट” या स्पर्धेचे उद्धघाटन सोमवार दि. 30 डिसेमबर रोजी दुपारी जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संतबाबा ज्योतिंदरसिंघजी, संतबाबा रामसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, मीतग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, भाई सतपालसिंघजी, गुरुद्वारा अधीक्षक स. राजदेविंदरसिंघ कल्ला, स. गुरचरनसिंघ घडीसाज, स. रविंदरसिंघ बुंगाई, स. गुरमीतसिंघ नवाब, स. नानकसिंघ घडीसाज, प्रा. जुझारसिंघ सिलेदार, हरनामसिंघ मल्होत्रा, खेमसिंघ पुजारी यांची मुख्य उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गोल्ड कप आणी सिल्वर कप ट्रॉफीला हार घालून खेळासाठी शुभेछा देण्यात आल्या.
आयोजन समिती पदाधिकारी जीतेन्द्रसिंघ खैरा, हरविंदर सिंघ कपूर, हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसिंघ अखबारवाले, महेंद्रसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलो, महिंदरसिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, विजयकुमार नन्दे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्याचे सत्कार केले. यंदाचा स्पर्धेचा हा 51 वां वर्ष असल्यामुळे आयोजन समिति तसेच खेळाडू मध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धेत राष्ट्रीयस्तराच्या सोळा संघांनी सहभाग घेतला असून अनेक गुणवंत खेळाडुंचे नांदेड मध्ये आगमन झाले आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास रोख एक लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.
मुंबई, नागपुर आणी…. संघांची विजयी सलामी : सोमवारी स्पर्धाच्या पहिल्या दिवशी एकूण चार सामने खेलविण्यात आले. यात मुंबईच्या यूनियन बँक हॉकी संघ, मुंबई पोर्टट्रस्ट संघ, ऑरेंज सीटी नागपुर आणि… संघांनी विजयी सलामी दिली. यूनियन बँक मुंबई संघाने उद्धघाटन सामन्यात रेल्वे बिलासपुर संघाचा 7 गोल विरुद्ध 1 गोल अंतराने दारून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात एमपीटी मुंबई संघाने एनडीएसएफ इस्लामपुर संघाचा 6 विरुद्ध 1 असा मोठा पराभव केला. आजच्या तिसऱ्या सामन्यात ऑरेंज सिटी नागपुर संघाने सुफियाना हॉकी क्लब अमरावती संघाचा 5 विरुद्ध 0 गोल अंतराने पराभव केला. तर चौथ्या सामन्यात ए. जी. हैदराबाद संघाने खालसा यूथ क्लब नांदेड संघाचा 2 विरुद्ध 1 गोल अंतराने पराभव केला.