नवीन नांदेड l महाराष्ट्र ग्रामीण व युवक विकास मंडळ परभणी यांच्यातर्फे पूज्य साने गुरुजीच्या जयंती निमित्य देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 इंदिरा गांधी हायस्कूल सिडिको नांदेड चे गणित अध्यापक एम.टी. कदम यांना प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार त्यांना 22 डिसेंबर महान गणितीय शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्या जयंती दिवशी वितरित झाला आहे, त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या विद्यार्थ्या सोबत स्विकारला आहे.
हा पुरस्कार नांदेड चे व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.हंसराज वैद्य व सत्यप्रभाचे संपादक,वरिष्ठ पत्रकार, भाजपचे प्रवक्ते पांडागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्या बद्दल शारदा भवन शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण ,उपाध्यक्ष्या अमिता भाभी, सचिव डी.पी.सावंत सहसचिव शेंदाररकर खजिनदार निंबाळकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.इंदिरा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.एम शिंदे ,पर्यवेक्षक गोकुळ वाले सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.