नवीन नांदेड l नांदेड येथील फ्लोरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग व मातृभूमी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग या दोन्हीही नर्सिंग स्कूल नवीन नांदेड च्या विध्यार्थीच्या शपथ विधीचा कार्यक्रम नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारंकर व मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 डिसेंबर 24 रोजी संपन्न झाला.
या सोहळ्याचे उदघाटक म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोढांरकर ,प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे उपमहापौर विनय पाटील गिरडे, पाठ्य निर्देशक सुनीता गिरी ,अध्यक्ष सतीश उस्तुरे तसेच प्रमुख उपस्थिती अनुराधा वर्मा डॉ.सुदर्शन रामभारती, श्री लालबाजी घाटे, सुभोध सूर्यकर, अनिल शेळके, उमाशंकर वर्मा,प्रणव बोढखे,प्रा. प्रियंका पाईकराव, प्रा.रेवती डहाळे व सर्व प्राध्यापक वर्ग,पालक तसेच सर्व विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांना शपथविधी देण्यात आला.