नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उपायुक्त संजय जाधव हे प्रदिर्घ सेवेनंतर 31डिसेबंर 24 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असुन मनपा व कर्मचारी, मित्र मंडळ यांच्या कढून सेवानिवृत्ती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजंदारी कर्मचारी म्हणून 1मे 1985रोजी रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत रुजू झाले, 22/9/88 रोजी वाघाळा नगरपालीका येथे जकात निरीक्षक,तर जकात अधिक्षक, म्हणून सेवा केली,26/3/97रोजी वाघाळा नगरपालिका व नांदेड शहर महानगर पालिका विभाजन होऊन एकत्र येऊन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका झाल्यानंतर 2006 मध्ये सहाय्यक आयुक्त पदोन्नती झाली.
महापालिका विविध क्षेत्रीय कार्यालय सह जकात, संस्थानिक कर, आस्थापना,कोंडवाडा,महिला बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा,यासह सिडको क्षेत्रीय कार्यालय, वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या पदभार सांभाळला व पदभार स्वीकारलेल्या अनेक भागात उल्लेखनिय कार्य करून मालमत्ता विभागासह ईतर विभागात वसुली केली,उल्लेखनीय कार्याबद्दल वेळोवेळी प्रशासनाने सत्कार व प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.
26 डिसेबंर रोजी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी उपायुक्त पदावर पदोन्नती दिली आहे.नावामनपा मध्ये जवळपास 18 वर्ष 10महिने सेवाकरून 31 डिसेंबर 24 रोजी नियोत वयोमाना नुसार सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्ती निमित्ताने कर्मचारी व मित्र मंडळ यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.