नवीन नांदेड l जुना कौठ्यातील भाजपाचे माजी गटनेता, नगरसेवक डॉ.अभिषेक सौदे यांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय अटल भुषण गौरव सन्मान पुरस्काराने नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालय येथे सन्मानित केल्याबद्दल जुना कौठा बसवेश्वर नगर येथील नरोबा (नृसिंह) मंदिर येथे सर्व भक्त परिवार यांच्या वतीने अभिषेक पुजा आरती करून सत्कार मुर्ती डॉ.अभिषेक सौदे यांच्या सत्कार करून पुढील कार्यास भक्त परिवार च्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
नरोबा मंदिर यांच्या वतीने मारोती पासवान, मंदिरचे पुजारी व्यंकटेश मुळी महाराज ,आरटवार काका,उमाटे मामा,तम्मेवार सावकार, सुर्यकांतराव झोळगे ,कळसकर काका,दिपक रौते, कंदकुर्ते काका, शिंदे व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.