नवीन नांदेडl नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे उपायुक्त पदी पदोन्नती
मिळालेल्या सरदार अजितपाल संधु व उधाण अधिक्षक पदी सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांची नियुक्ती झाल्याबद्दल सिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी गेल्या आठवड्यात जवळपास न ऊ जणांना पदोन्नती दिली होती. 29 डिसेंबर रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे पाणी पुरवठा संदर्भाने भेट दिली असता सिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी यांच्या वतीने अजितपाल संधु व सहाय्यक आयुक्त तथा उधाण अधिक्षक डॉ. मिर्झा बेग यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या ,यावेळी कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग, वसंत कल्याणकर,वसुली लिपीक मालु एनफळे,दिपक जौधंळे,रमेश यशवंतकर,रविंद्र पवळे,शाम आरकुले, मदन चौहान,यांच्या सह नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर व छायाचित्रकार सारंग नेरलकर यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.