श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। दि,२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूरचे इयत्ता सहावीचे ६ व नववीच्या १ विद्यार्थ्यांनी यश संपादन केला आहे. शाळेतील एकूण ७ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
मुंबई विज्ञान शिक्षक परिषदेमार्फत दरवर्षी इयत्ता सहावी.नववी च्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा लेखी प्रात्यक्षिक व मुलाखत अशा तीन स्तरावर घेण्यात येते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी त्यांच्यात याविषयी आवड निर्माण व्हावी जेणेकरून यातूनच हुशार शास्त्रज्ञ देशाला मिळावे या हेतूने ही परीक्षा घेतली जाते.
या परीक्षेत अशित मनोहर,संपती राऊत,यश ठाकुर, श्रेयश आठवले,रेहान घानीवाले, ईश्वरी राऊत, आराध्या भगत या विद्यार्थ्यांची निवड ही दुसऱ्या फेरीसाठी झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक भाग्यवान भवरे, प्राचार्य एम, आर,मनोहरन आकाश राठोड,ऐफाज शेख,वैभव मुडानकर,रचना निले,सोहेल चव्हाण, प्रफुल्ल भंवरे, नागेश्वर महल्ले,राजू गंदेवाड,अदिनी यांनी कौतूक केले आहे.