हिमायतनगर। कारला येथे श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रारंभ पौष शुध्द ०१ दि.३१/१२/२०२४ रोज मंगळवार पासून होणार असुन सात दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह चालणार आहे या भक्तीमय सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .
हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील श्री कृष्ण मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे यंदाही या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला दि.31 डिसेंबर पासून प्रारंभ होणार असुन 7 जानेवारी रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिन कार्यक्रम काकडा सकाळी ५ ते ६, ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ७ ते १०, हरिपाठ सायंकाळी ४.३० ते ६ ,हरिकिर्तन • रात्री ८ ते १०.३० असे असणार आहे या सप्ताहतील किर्तनकार ह.भ.प. नामदेव महाराज ताङकुले वडगांवकर,ह.भ.प. रूपालीताई पाटील पवनेकर,ह.भ.प. शिवाजी महाराज इंगळे,ह.भ.प. गुरूवर्य महारूद्र स्वामी महाराज दैठणेकर, ह.भ.प. कृष्णा महाराज बोपिलवार कालेकर, ह.भ.प. शंकर महाराज बाभळीकर,ह.भ.प. बालयोगी श्यामसुंदर महाराज गिरी, यांचे किर्तन होणार असून या सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तनकार ह.भ.प. अशोक महाराज तळणीकर,यांचे होणार आहे.
सप्ताचे गायनाचार्य – ह.भ.प. ज्ञानेशार महराज बोटेवाड सिबदरेकर, ह.प.भ. मारोती महाराज राहुलवाड, ह.भ.प. आनंद महाराज गोसलवाड , ह.भ.प. भगवानराव महाराज गुंपलवाड, मृदंगाचार्य ह.भ.प.प्रथमेश यटलेवाड़, तबलावादक ह.भ.प.अशोक बॉपिलवार, हार्मोनियम- ह.भ.प. रामदास महाराज बोपिलवार चोपदार ह.भ.प. माधव गारशेटवाड, विणेकरी ह.भ.प.अशोक महाराज बॉपिलवार यांचे होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री कृष्ण मंदीर कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.