HomeनांदेडRegister on e-Samrudhi portal | शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आधारभुत किंमत...

Register on e-Samrudhi portal | शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा – NNL

नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी

नांदेड| नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृध्दी पोर्टल सुरु केले आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्येही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबिन खरेदी करण्यात येणार आहे.

तरी सर्व शेतकऱ्यांनी ई-समृध्दीचा दिलेला क्युआर कोड स्कॅन करुन अथवा https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदी प्री-रजिस्ट्रेशन करावे. तसेच केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments