हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे क्रीडा संचालक डॉ. दिलीप किशनराव माने हे आज दिनांक 31/12/2024 रोजी नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा निरोप समारंभ सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सूर्यकांता ताई पाटील आणि संस्थेचे सचिव कुलकर्णी सरांनी माने सरांना सहकुटुंब सहपरिवारास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश जाधव संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हे लाभले होते . प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपप्राचार्य श्री डाके सर व मुख्याध्यापक श्री रणखांब सर लाभले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटामाटात सेवा पुर्तीचा हा सोहळा संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सत्कारमूर्ती डॉ.डी.के. माने सरांचा सहकुटुंब सहपरिवार भव्य सत्कार करण्यात आला. डॉ.डि .के मगर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर डॉ .शेख शहेनाज मॅडम यांनी त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्यावरती कविता रूपी आपले मनोगत व्यक्त केले . तदनंतर श्री.रणखांब सर यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट नातं असतं आपल्या मनोगतातून व्यक्त केलं .
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांनी आपल्या मनोगतातून माने सरांच्या सहवासातील आठवणी जिवंत करत सरांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला तदनंतर निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छाचा सण आहे,
पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासू अन् दुसऱ्यात आसु मन नितळ नितांत आठवणीचा आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे.असे आपले मनोगत व्यक्त केले . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी क्रीडा शिक्षक कसा असावा यावरती त्यांच्या जीवन प्रवासा वरती वर्णन केले .अनेक खेळामधून विविध विद्यापीठ स्तरावरती ,राष्ट्रीय स्तरावरती महाविद्यालयाला पारितोषिक मिळवून दिले यावरती त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
त्यानंतर माजी विद्यार्थी गजानन चायल, भाजपा (ता . अध्यक्ष), विशाल राठोड, शिवसेना शहर प्रमुख गजानन हारडपकर हे महाविद्यालयातील पहिल्या बॅचचे विद्यार्थी असून सुद्धा पंचवीस वर्षांनंतर आपल्या गुरुच्या निरोप संमारंभासाठी उपस्थित राहून, त्यांनी माने सरांची वाजत गाजत मिरवणूक काढत,फटाक्याचा आतीष बाजी करून सरांचा पेढा भरून थाटामाटात सत्कार केला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण सांवत यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री.राजू बोंबले यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन डॉ.श्याम इंगळे यांनी केले.कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.