Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत
नांदेड, आरोग्य, छत्रपती संभाजीनगर

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत

छत्रपती संभाजीनगर| राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जानेवारी ते जून 2025 या अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 3 हजार 39 रुग्णांना 25 कोटी 58 लाख 31 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागरिकांचा विचार करून जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले. त्यातून लाभार्थी नागरिकांची संख्या वाढली. त्यासोबतच आरोग्य शिबिर व रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. जिल्हानिहाय मदत :- मागील सहा महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 633 रुग्णांना 5 कोटी 33 लाख 38 हजारांची मदत करण्यात आली.  बीड -610 रुग्णांना 4 कोटी 89 लाख 6 हजार, परभणी 533 रूग्णांना 4 को...
Swami Sarang Chaitanyaji Maharaj : हिरण्यकशिपूचा वध आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानी घेतला नृसिंह अवतार – हभप.भागवताचार्य परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज
धार्मिक, नांदेड

Swami Sarang Chaitanyaji Maharaj : हिरण्यकशिपूचा वध आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानी घेतला नृसिंह अवतार – हभप.भागवताचार्य परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रीमद भागवत महापुराण कथेत तिसऱ्या दिवशी विशेषतः सप्तम स्कंधामध्ये हिरण्यकशिपूचा वध आणि नृसिंह अवताराचे अत्यंत प्रभावी आणि भक्तिरसपूर्ण वर्णन हभप. भागवताचार्य परमपूज्य विदर्भ केशव स्वामी सारंग चौतन्यजी महाराजांनी सांगितले आहे. हे संपूर्ण प्रसंग भक्त प्रल्हादाच्या भक्ती, हिरण्यकशिपूच्या अहंकार आणि भगवंताच्या अद्वितीय लीलेचे प्रतीक मानले जाते असल्याचे ते म्हणाले. उपस्थित भाविक भक्तांना भागवत कथा सांगताना स्वामीजी म्हणले कि, हिरण्यकशिपू हा एक बलाढ्य असुरराजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवले होते. “माझा मृत्यू न होवो, ना मनुष्याने, ना प्राण्याने, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना शस्त्राने, ना अस्त्राने, ना आकाशात, ना पृथ्वीवर, ना पाताळात.” हा वर मिळाल्यानंतर त्याचा अहंकार अनियंत्रित झाला. त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली. सर्वत...
annual anniversary : लंगर साहिब च्या सालाना बरसी उत्सवाची तयारी सुरू
धार्मिक, नांदेड

annual anniversary : लंगर साहिब च्या सालाना बरसी उत्सवाची तयारी सुरू

नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने आज ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होत आहे. यानिमित्त नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होणार आहे. सालाना बरसी साठी भव्य दिव्य असा शामियाना उभारला जात आहे.. पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी सालाना बरसी उत्स वात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल होत आहेत. लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या वतीने हा सालाना बरसीचा उत्सव आयजित केला जातो. लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येत आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सच...
Sarang Chaitanyaji Maharaj : सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला – भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराज
धार्मिक, नांदेड

Sarang Chaitanyaji Maharaj : सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला – भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराज

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगरचं श्री परमेश्वर महादेव मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर एक पवित्र धाम आणि तीर्थक्षेत्र देखील आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. वर्षातून तीन दिवस सतत कथा होणं, हे महाराष्ट्रात पहिला गाव म्हणजे परमेश्वराची वाढोणा नगरी आहे. नित्य पूजा-अर्चा, आणि स्थानिक भाविकांचा नित्यसंग हे सर्व या स्थळाला सामान्य मंदिरांपेक्षा वेगळं आणि तीर्थाचे स्वरूप प्राप्त करून देत. त्यामुळे सर्वांनी इतर कोणत्या मंदिरात दर्शनाला नाही गेलं तरी चालेल मात्र सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला असे असे उदगार भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराजांनी काढले. पुढे मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणले कि, भागवत केवळ ग्रंथ नव्हे "भागवत ही ज्ञानाची गंगा आहे. तिला बोलवावं लागत नाही, ती आपोआप येते." जिथे श्रद्धा असते, जिथे मन...
protests in Mumbai : वैद्यकीय शिक्षणात 80:20 लिंगभेदी नियमानुसार मेल नर्सेसवर अन्याय — रद्द करा! 5 ऑगस्ट रोजी मुंबईत तीव्र निदर्शने
नांदेड, महाराष्ट्र, मुंबई

protests in Mumbai : वैद्यकीय शिक्षणात 80:20 लिंगभेदी नियमानुसार मेल नर्सेसवर अन्याय — रद्द करा! 5 ऑगस्ट रोजी मुंबईत तीव्र निदर्शने

मुंबई| मेल नर्सेस बचाव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी मुंबईत तीव्र निदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. याआधी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदने सादर करण्यात आली, तसेच सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांना निवेदने देऊन न्यायाची मागणी केली गेली. अधिवेशनातही भेटीगाठी घेऊन आवाज उठवण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार निलेश लंके, आमदार डॉ तुषार राठोड, मा.सत्यजित दादा तांबे, रविकांत दादा तुपकर साहेब इत्यादीनी पत्र लिहून विरोध दर्शविला. वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, आयुक्त, सचिव आणि खुद्द मंत्री यांना चार ते पाच वेळा थेट भेटून चर्चा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, हे शर्मनाक आणि दुर्दैवी आहे! आमचा अंत पाहू नका! लिंगभेदाचा अन्याय सहन केला जाणार नाही! आज डॉक्टर, टेक्निशियन, पोलिस, फार्मासिस्ट या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी आहे – ...
Sikhs ; महानगरपालिकेत शीख धर्मियांसाठी ‘आनंद विवाह नोंदणी नियम २०२०’ ची अंमलबजावणी
नांदेड, लाइफस्टाइल

Sikhs ; महानगरपालिकेत शीख धर्मियांसाठी ‘आनंद विवाह नोंदणी नियम २०२०’ ची अंमलबजावणी

नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या २३ एप्रिल २०२० रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या 'महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम, २०२०' च्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेत आता शीख धर्मीयांसाठी आनंद विवाह नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शीख नागरिकांना त्यांच्या विवाह नोंदणीसाठी सुलभ आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार आहे. आनंद विवाह अधिनियम, १९०९ अंतर्गत महाराष्ट्रात आनंद विवाह नोंदणी नियम, २०२० ची अंमलबजावणी करणे आणि शीख धर्मीयांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी विवाह निबंधकांची नियुक्ती करणे आवश्यक होते. यासंदर्भात महानगरपालिकेने मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या पुढाकारातून तसेच अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नियंत्रणात महापालिकेने योग्य ...
Hemant Patil ; सिडको शिवसेना बालेकिल्ला पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील, आ.हेमंत पाटील
नांदेड, राजकीय

Hemant Patil ; सिडको शिवसेना बालेकिल्ला पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील, आ.हेमंत पाटील

नवीन नांदेड l सिडको शिवसेनेच्या बालेकिल्ला पुन्हा अबाधित राहील यासाठी शिवसैनिकांना आगामी मनपाच्या निवडणूक निमित्ताने शिवसैनिक व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून दोन्ही प्रभागातील एक समिती करून नऊही जागा निवडणूक निमित्ताने लढविण्याची तयारी ठेवावी युती असो किंवा नसो तयारी लागा असे आवाहन शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सिडको येथे आयोजित बैठकीत केले. आगामी नांदेड मनपा निवडणूक निमित्ताने सिडको येथील धुत बँकेट हॉल येथे 28 जुलै रोजी आयोजित पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यी बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी आमदार आनंदराव पाटील बोढारकर, दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,माजी नगरसेवक,बाळासाहेब देशमुख, राजेंद्र कुलथे,सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे,ओबीसी जिल्हा प्रमुख अनिल पाटील धमणे,महिला आघाडीच्या स्मिता कुलकर्णी ,गजानन राजरवार,यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे दक...
Kaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन
नांदेड, धार्मिक

Kaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन

नवीन नांदेड l नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास पहिला सोमवार निमित्त दी 28 जुले पहिल्या सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय , जय काळेश्वर भगवान कि जय घोषणा देण्यात आल्या. रात्री १ ते ५ महा अभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळपासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले.. काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार 28 जुले रोजी भाविक भक्तांची दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी मोठ्या प्रमाणात अधिकारी, पोलीस अमलंदार,महिला पोलीस...
Bike trolley experiment : पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या गोदाकाठच्या गुंज शाळेतील गुरुजीचा बाईक ट्रॉलीचा प्रयोग
करियर, नांदेड

Bike trolley experiment : पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या गोदाकाठच्या गुंज शाळेतील गुरुजीचा बाईक ट्रॉलीचा प्रयोग

लोहा l जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाल्याचा कारणाने शाळा बंद होणार ही भीती ग्रामस्थांना वाटत असते .अशीच अवस्था गोदाकाठी असलेल्या पालम तालुक्यातील गुंज या गावाची झाली होती .गाव उठले आणि दोन ठिकाणी जाऊन बसले.,पण शाळा जुन्याच गावात राहिली.पण विद्यार्थी मात्र अन्यत्र जाऊ लागले.पटसंख्या अभावी शाळा बंद पडणार अशी परिस्थिती उदभवली पण उपक्रमशील शिक्षक लोह्याचे भूमिपुत्र सुनील राऊत त्याचे सहकारी रुस्तुम लोखंडे यांनी ग्रामस्थानच्या मदतीने जुगाड करत बाईक ट्रॉली आणली आणि दररोज विस्तारीत गावातून विद्यार्थी ने -आण करत आहेत. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून हा व्हिडिओ व्हायरल झाला. ग्रामस्थ व गुरुजींच्या इच्छाशक्तीतून गावातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली पालम (जि परभणी, ) तालुक्यातील गुंज हे गाव गोदावरी नदी काठी आहे. कडेला वसलेलं हे गाव सधन बारमाही ओलिताखाली आलेलं . जु...
rejects 81 appeals : एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले
छत्रपती संभाजीनगर, नांदेड, महाराष्ट्र

rejects 81 appeals : एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले

नांदेड| नांदेड येथील जनक रामराव गायकवाड या अपिलार्थीने राज्य माहिती आयोग, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत दाखल केलेले 81 द्वितीय अपील आयोगाने फेटाळले आहेत. यासोबतच 19 अपिलार्थींनी दाखल केलेले 7 हजार 567 व्दितीय अपील आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळले आहेत. अपिलार्थी यांनी विविध ग्रामपंचायत कार्यालयाकडे 81 माहितीचे अर्ज सादर केलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या खालील नमूद अपिलार्थी यांची द्वितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळलेली आहेत. आयोगाकडील सदरील निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. बहुतांश अपिलार्थी कार्यालयाकडे वारंवार अर्ज सादर करतात. अपिलार्थी व्यक्तिशः माहितीची मागणी करुन त्याप्रमाणे माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. अपिलार्थी यांनी जेवढ्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे माहिती अर्ज सा...