Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mla. Baburao Kadam Kohlikar : मागे काय झाल ते विसरुन जाऊ यानंतर माफी नाही – आ बाबुराव कदम कोहळीकर -NNL

Mla. Baburao Kadam Kohlikar : मागे काय झाल ते विसरुन जाऊ यानंतर माफी नाही – आ बाबुराव कदम कोहळीकर -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव शेख चांदपाशा| मागे काय झाल हे विसरुन जा... ह्यानंतर नागरिकांच्या साध्या कामा करिता प्रशासनाद्वारे आडवणुक होता कामा नये. अश्या कडक सुचना हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयाच्या प्रगाणांत आयोजित केलेल्या प.स.पाणी टंचाई व जनता दरबार बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. महसूल व पोलीस प्रशासनाच्या बाबतीत मात्र त्यांची नरम भूमिका दिसून आली. विविध कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कानपिचक्या देत आमदार कोहळीकर पुढे म्हणाले की, मी सहजासहजी आमदार झालेलो नाही. मला सहज म्हणून घेवु नका मला तळागाळात सर्वसामान्याच्या काय समस्या असतात याची जाणीव आहे. जो कोणी प्रशासनाचा अधिकारी किवा कर्मचारी जाणुनबुजुन सरळ कामाला अडचणी निर्माण करत असेल. तर त्याला सरळ कसे करयाच हे मला माहित आहे, त्यामुळे यांची वेळ कुणीही येवु देवु नये अश्या कडक शब्दात त्यांनी ...
providing load shedding free electricity supply : गावठाणसाठी लोड शेडिंग मुक्त विद्युत पुरवठा देऊन सिरंजनी गावच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा – सरपंच सौ. मेघा करेवाड -NNL

providing load shedding free electricity supply : गावठाणसाठी लोड शेडिंग मुक्त विद्युत पुरवठा देऊन सिरंजनी गावच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा – सरपंच सौ. मेघा करेवाड -NNL

राजकीय, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| गावठाणसाठी लोड शेडिंग मुक्त विद्युत पुरवठा देऊन गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी आणि गावातील लोकांना माणसासारखे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिरंजनीसाठी मंजूर असलेले स्वतंत्र फिडरचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी सिरंजनी येथील सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मौजे सिरंजनी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड हे जवळपास चार हजार लोकसंख्या वस्तीचे गाव आहे. महावितरण विभागाकडून येथे बेकायदेशररित्या दिवसाला पाच तास लोड सेडींग घेतल्या जात आहे. इतरही वेळात लाईटचा लपंडाव सारखा चालू असल्याने गावातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत लोड सेडिंग घेत असल्यामुळे सकाळी उठून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान होत ...
Shiv Sena OBC ; गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांची मंत्रालयात शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमूख अनिल पाटील धमने यांनी घेतली सदिच्छा भेट – NNL

Shiv Sena OBC ; गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांची मंत्रालयात शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमूख अनिल पाटील धमने यांनी घेतली सदिच्छा भेट – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l महाराष्ट्र राज्याचे गृह(शहर), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन‌खात्यांचे महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना .योगेश दादा कदम यांची मंत्रालया मध्ये महत्वाच्या कामा निमित्त विशेष भेट घेऊन सत्कार केला. शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे ओबीसी नेते बाळासाहेब किसवे तसेच समर्थक ओबीसी व्हिजे एनटी चे नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने ,धुळे जिल्हाप्रमुख सोशल मिडीया राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय कुसळकर,सोलापूर जिल्हाप्रमुख सुयश कर्चे, धाराशिव जिल्हाप्रमुख कमलाकर दाणे, यांच्या सह ओबीसी व्हिजे एनटी चे महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी यांनी ना. कदम मंत्री महोदयांचा सत्कार सन्मान करून विविध विषयावर जवळ पास आर्धा‌ तास अनेक‌ विषयावर चर्चा झाली . शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी...
Mp.Dr. Ajit Gopchade : भाजपा सदस्य नोंदणीच्या घर चलो अभियानात सहभागी व्हा – खा.डॉ. अजित गोपछडे -NNL

Mp.Dr. Ajit Gopchade : भाजपा सदस्य नोंदणीच्या घर चलो अभियानात सहभागी व्हा – खा.डॉ. अजित गोपछडे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला राज्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा सदस्य नोंदणीसाठी ' घर चलो अभियान ' राबविण्यात येणारा असून दिनांक 10 जानेवारी रोजी सर्व बूथ वर राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी होऊन भाजपाची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भारतीय जनता पार्टीचे जाळे सर्व दूर आणि सर्व व्यापक विणले जात आहे. प्रत्येक शहर , महानगर , गाव , वाडी, तांड्यापर्यंत भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे पोहोचली जात असून देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या खऱ्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काम करत आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेला भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थाने लोकशाहीचा तारक ठरला आहे. शोषित , ...
Chief Minister Devendra Fadnavis : आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Chief Minister Devendra Fadnavis : आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यातील मृद व जलसंधारणांतर्गत माथा ते पायथा तत्त्वावर पाणलोटाचा विकास करावा तसेच जलयुक्त शिवार अभियान ३.०, तलाव दुरुस्ती योजना यासह विभागातंर्गत राबविण्यात येणा-या नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत, आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. मंत्रालयात मृद व जलसंधारण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यावेळी उ...
Radhakrishna Vikhe Patil : सिंचन व्यवस्था बळकटीकरणासाठी अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील -NNL

Radhakrishna Vikhe Patil : सिंचन व्यवस्था बळकटीकरणासाठी अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था व अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा. याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यास मदत होईल. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील कामांचा आढावा घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव सर्वश्री अभय पाठक, संजीव टाटू, अभियंता प्रसाद नार्वेकर यांच्यासह गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलसंपदा मंत्री श्री...
Nanded ; नांदेड उत्तरमध्ये उबाठा ला खिंडार : माधव पावडे सह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश – NNL

Nanded ; नांदेड उत्तरमध्ये उबाठा ला खिंडार : माधव पावडे सह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने नाराज असलेल्या माधव पावडे सह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे आक्रमक शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र निष्ठावान शिवसैनिकांना डावलून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये उपऱ्यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या माधव पावडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँ...
Mla sreejaya chavan ; वचन पूर्तीसाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर; शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार -आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण -NNL

Mla sreejaya chavan ; वचन पूर्तीसाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर; शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार -आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
मुदखेड। शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही आमदार अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकी पूर्वी सिंचन ,दळण -वळण,शिक्षणसह विविध क्षेत्रातील दिलेल्या आश्वासनांची पूर्ती व्हावी यासाठी आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण ‘अ‍ॅक्शन मोड’वर आहेत. मंगळवारी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील बारड शेंबोली पांढरवाडी या भागात ग्रामस्थांच्या भेटी घेत समस्या, प्रश्न यावर थेट आ.अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांनी संवाद साधला. शाळेच्या संदर्भात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे, इमारती सुसज्ज करणे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी बारड चे सरपंच प्रभाकर आठवले, प्रा .कैलास दाड, उपसरपंच बाळासाहेब बारडकर, मंगलाताई धुळेकर, नरसिंगराव लोमटे, दिगंबर टिपरसे, निलेश देशमुख, तालुका महामंत्री मुन्ना चांडक , उ...
Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL

Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य आणि केंद्र सरकारकडून ज्या ज्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्या योजना प्रभावीपणे राबवत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळवून द्या असे निर्देश खा.डॉ. अजित गोपछडे यांनी देगलूर आणि बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत दिले . यावेळी देगलूर येथे पार पडलेल्या बैठकीस आ. जितेश अंतापुरकर, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील ,तहसीलदार भरत सूर्यवंशी , बीडिओ शेखर देशमुख, अनिल पाटील खानापूरकर, प्रशांत दासरवार, शंकरराव कंतेवार,शिवाजीराव कणकंटे, यादवराव देसाई, पंकज देशमुख, रवी पाटील नरंगलकर, प्रकाश पाटील बेंबरेकर,रमेश कंतेवार, अशोक साखरे, प्रशांत पाटील आचेगावकर, रुपेश पाटील भोकसखेडकर, दिपक शहाणे, शिवराज पाटील माळेगावकर, शिवकुमार देवाडे, प्रशांत पाटील भोकसखेडकर, अशोक गोपछडे, बसवंत गोपछडे, बालाजी पाटील वन्नाळीकर, सुभाष माटलवार, अशोक पाटील शेवाळकर तर बिलोली येथ...
Mla. Balaji Kalyankar : येलो मॉर्निंग ग्रुपची दिनदर्शीका म्हणजे सामाजीक बांधीलकीचे प्रतीक-आ.बालाजी कल्याणकर -NNL

Mla. Balaji Kalyankar : येलो मॉर्निंग ग्रुपची दिनदर्शीका म्हणजे सामाजीक बांधीलकीचे प्रतीक-आ.बालाजी कल्याणकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| येला मॉर्निंग ग्रुपच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनदर्शीका 2025 चे अत्यंत सुबक व वर्षभरातील संपूर्ण माहितीचा खजीना असलेली दिनदर्शीका साकारण्यात आली. सदर दिनदर्शीकेचे प्रकाशन नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर व सौ.संध्याताई कल्याणकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदर दिनदर्शीका ही ग्रुपचे सचिव गजानन सावंत यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली याबद्दल आमदार कल्याणकर यांनी त्यांचे कौतुक केले. येलो मॉर्निंग ग्रुपचे कार्य हे प्रशंसनीय असून त्यांनी अनाथ मुलींचे विवाह लावणे, सामाजीक उपक्रम राबवणे, गरजूंना मदत करणे यासह अनेक उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जपत असल्याचे प्रतिपादन यावेळी आ.बालाजी कल्याणकर यांनी केले. याप्रसंगी येलो मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर गिरोड सर, ग्रुपचे अध्यक्ष सुरेश वाघमारे, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर शेटे, रंगनाथ राठोड, प्रसिद्धी प्रमुख दिपक ख...
error: Content is protected !!