नांदेड| येला मॉर्निंग ग्रुपच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनदर्शीका 2025 चे अत्यंत सुबक व वर्षभरातील संपूर्ण माहितीचा खजीना असलेली दिनदर्शीका साकारण्यात आली. सदर दिनदर्शीकेचे प्रकाशन नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर व सौ.संध्याताई कल्याणकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सदर दिनदर्शीका ही ग्रुपचे सचिव गजानन सावंत यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली याबद्दल आमदार कल्याणकर यांनी त्यांचे कौतुक केले. येलो मॉर्निंग ग्रुपचे कार्य हे प्रशंसनीय असून त्यांनी अनाथ मुलींचे विवाह लावणे, सामाजीक उपक्रम राबवणे, गरजूंना मदत करणे यासह अनेक उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जपत असल्याचे प्रतिपादन यावेळी आ.बालाजी कल्याणकर यांनी केले.
याप्रसंगी येलो मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर गिरोड सर, ग्रुपचे अध्यक्ष सुरेश वाघमारे, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर शेटे, रंगनाथ राठोड, प्रसिद्धी प्रमुख दिपक खांबाळकर, शिवराज लंगडे, माणिक हाके, गजानन तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.