किनवट, परमेश्वर पेशवे| इस्लापूर येथील नविन जि.प.प्रा.शाळा सावरकर नगर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी
जेष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड व उपस्थित पत्रकार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांचे शालेय समितीच्या वतीने नोटबुक व पेन देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकार परमेश्वर पेशवे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले व पत्रकार दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक इर्शाद पांडे यांनी केले.
यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड,परमेश्वर पेशवे,गौतम कांबळे, प्रमोद जाधव,रावसाहेब कदम, इमरान घोडके, विशाल भालेराव, तसेच शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व पालक जगदीप हनवते, लक्ष्मण जाधव, बालाजी तोंडारे, देवकते,भुरके,फरकाडे, धुमाळ, मुख्याध्यापीका श्रीमती अडबलवार मॅडम शिक्षक इर्शाद पांडे व विद्यार्थी उपस्थित होते.