Mla. Baburao Kadam Kohlikar : हदगाव विधानसभाक्षेञात पुर्वीच्या लोकप्रतिनिधीने नेहमी विकास कामात विरोध केला – आ.बाबुराव कदम कोहळीकर -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव - हिमायतनगर तालुक्यात बायपास तथा अंडरग्रावूंड ड्रेनेज असे अनेक कामे करावायाची होती. परंतु या पुर्वीच्या लोकप्रतिनिधीच्या राजकीय विरोधामुळे कामे करता आला नाही. आता तो अडथळा दुर झाल्याने ही विकास कामे करावायची आहेत. अस हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगाव शहरात आयोजित भव्य नागरी सत्कार व माजी खा.सुभाष वानखेडे याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या मंचावरून बोलताना केलं.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधापरिषदगट नेते आ. हेमत पाटील हे होते तर हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर याचा नागरी सत्कार व माजी खा सुभाष वानखेडे याच्या वाढदिवसाच्या या भव्य सोहळ्याचे शानदार आयोजन आनिल पाटील बाभळीकर यांनी केले होते. या सोहळ्याला प्रामुख्याने नादेड जिल्हा शिवसेना प्रमुख विवेक देशमुख, माजी प.स. सभापती बाळासाहेब कदम, माजी शिवसेना तालुका प्रमुख व शहरप्रमुख पाडु...









