![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/Suresh-Palshikar.jpg)
हिमायतनगर,अनिल मादसवार| स.न.2023-24 मध्ये हिमायतनगर तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT द्वारे तात्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिमायतनगर तालुका अध्यक्ष अभिषेक लुटे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
हिमायतनगर तालुक्यात सन 2023-24 मध्ये अतिवृष्टी होऊन झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याची दाखल घेऊन त्या नुकसानीचे सर्व्हे होवून शासनाकडून त्यांना अनुदान सुद्धा मंजूर झाले. त्या संदर्भात शेतकऱ्यांना E-KYC करण्यासाठी सांगितले होते. मागील महिन्याभरात शेतकऱ्यांनी E-KYC सुद्धा केली आहे. परंतु बरेच दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
शेणाने मंजूर केलेले अनुदान काडी मिळेल याची नुकसानग्रस्त शेतकरी वाट पहत असून, शेतकऱ्यांची झालेली कार्तिक बिकट स्थिती लक्षात घेऊन तात्काळ त्यांच्या खात्यावर DBT मार्फत नुकसानीचे अनुदान जमा करण्यासाठी संबंधितांना सुचना कराव्यात अशी विनंती एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिमायतनगर तालुका अध्यक्ष अभिषेक लुटे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे केली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)