Immediately deposit the loss subsidy in the account of farmers : हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानाईचे अनुदान तात्काळ जमा करा – अभिषेक लुटे -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| स.न.2023-24 मध्ये हिमायतनगर तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT द्वारे तात्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिमायतनगर तालुका अध्यक्ष अभिषेक लुटे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात सन 2023-24 मध्ये अतिवृष्टी होऊन झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याची दाखल घेऊन त्या नुकसानीचे सर्व्हे होवून शासनाकडून त्यांना अनुदान सुद्धा मंजूर झाले. त्या संदर्भात शेतकऱ्यांना E-KYC करण्यासाठी सांगितले होते. मागील महिन्याभरात शेतकऱ्यांनी E-KYC सुद्धा केली आहे. परंतु बरेच दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात दिवसेंदिव...
