नवीन नांदेडl 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त श्री शंकरराव चव्हाण प्राथमिक विद्यालय असर्जन येथे विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जेष्ठ पत्रकार रमेश ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रजवलन करण्यात आले.


या सांस्कृतिक कार्यक्रम वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुशराव गाढे सौ .फुलारीबाई सौ .अनिता भोसले सौ वाघमारे, पत्रकार सारंग नेरलकर यांची उपस्थिती होती. 1ली ते 7वीच्या विद्याथ्यांनी सास्कृतिक कार्यक्रमात मराठी हिंदी,लोकगिते , भावगीत पोवाडे यासह अनेक गिते सामुहिक वैयक्तिक गितावर सहभाग घेवून एका – पेक्षा एक सरस नृत्य सादर केले, मोबाईलचा वेडा नाटीका सादर केली, यात लहान – मुलांवर अति वापराचे दुष्परीणाम आणि पालकांची भूमिका लक्षात आणून दिली.


या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी फतेजगंपूर ,सुगाव,कोटतीर्थ,परिसरातील पालकांची उपस्थितीती होती . यावेळी विद्याथ्यांचे कौतुक केले ,सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश वडजे यांच्या सह तुकाराम पातेवार, डि वाय.तुडमे, संभाजी कौटकर, रेड्डी साहेबराव पवार सरपंच सौ. जाधव, के.डी.सौ.जे.ए.पाटील,सौ.वंजे एम.व्ही.सौ.अनिता भोसले सौ. प्रणिता फुलारी,सौ.वाघमारे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
