नवीन नांदेडI धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने कै.आनंद दिघे उद्यानात नांदेड दक्षिणचे आ.आनंद पाटील बोंढारकर व मान्यवरांच्या हस्ते वहीपेन चे वाटप करण्यात आले.

सिडको येथे गेल्या पाच वर्षां पासून आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष कल्याण पाटील दरेगावे हे काम करीत असून 27जानेवारी रोजी जयंती निमित्त नांदेड ऊस्मानगर रोडवरील चौकात धर्मवीर चौकात धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उधाण परिसरात छत्रपती शिवाजी महाराज ,हिंदू ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन आ.आनंदराव पाटील बोढारकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे प्रमुख पाहुणे नांदेड शहर दक्षिण अध्यक्ष तुलजेश यादव,शंकर पिनोजी , सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,पप्पू गायकवाड, दशरथ अंधारे, यांच्या पस्थितीत विध्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करण्यात आले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आ. बोढारकर यांनी बाळासाहेबांचे विचार धर्मवीरांच्या शिकवणीचे स्मरण करून शिवसेनेचे संघटन सामाजिक कार्याची जाणीव करत आणि सदर ट्रस्टच्या माध्यमातून करीत असलेल्या सामाजिक कार्याची नोंद आवर्जून केली.

यावेळी मराठवाडा अध्यक्ष धर्मवीर आनंद दिघे विचार मंचाचे गजानन कुलकर्णी, आतील यशवंत पाटील दरेगावे ,व दीनानाथ दरेगावे , सत्यम कत्ते ,विकास वाघमारे,श्रीनाथ दरेगावे,टेकाळे मामा ,आकाश जाधव, माधव भोंग, आदिनाथ पाटील श्रीनाथ दरेगावे, कृष्णा पोखरणे,अमरनाथ दरेगावे यांची उपस्थिती होती, सूत्रसंचालन शाहीर गौतम पवार यांनी केले तर आभार दशरथ कंधारे यांनी मानले . जीएनएम कॉलेजच्या वतीने नवनिर्वाचित आ.आंनदराव बोढारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
