मुक्रमाबाद, बस्वराज वंटगिरे| मुक्रमाबाद येथील जिजाई इंग्लिश स्कूल शाळेतर्फे आनंद नगरीचे आयोजन (Anand Nagri Utsav) करण्यात आले या दिवशी काही विद्यार्थ्यांनी पाणीपुरी,वडापाव, इडली सांबर,शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू, सुशीला, चिवडा ,कट मिरची,पोहे,ढोकळा, टरबुज, पपई, शेंगदाणे लाडु, तिळाचे लाडू,ईतर साहित्य विक्री केले. यामधून १० ते १५ हजार रूपयांची उलाढाल झाली.

शिक्षणाचा उद्देश केवळ मुलांना साक्षर करणे नसून दैनंदिन जीवनातील व्यवहार कुशलपणे करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे असते. अशा व्यवहारांची मुलांना पावलोपावली गरज भासते. या गतिमान आयुष्यात मुलांना व्यावहारिक चातूर्याची गरज आहे. त्यांना व्यवहार कुशल बनवण्यासाठी शालेय वातावरणातच व्यवहाराच्या ज्ञानाची गरज असल्याने जिजाई इंग्लिश स्कूल येथे मुलांच्या व्यावहारिक पातळीवर अधिक चालना देण्यासाठी बाल आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद नगरी चे उद्घाटन कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बि.एस.मोरे सर, पत्रकार बस्वराज वंटगिरे,घोन्शीकर सर,राजुरे सर, संचालक गजानन राठोड सर यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन रीबीन कापले.

उद्घाटन करून स्टॉलवर वेगवेगळे पदार्थ खरेदी करून सुरुची आस्वाद घेऊन मुलांचा उत्साह द्विगुणित केला.गावातील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांनी या आनंद नगरीचा आनंदाने लाभ घेतला. शेवटी ज्या मुलांनी स्टॉल लावलेले आहे त्या मुलांचा खरेदी विक्री व झालेला नफा तोटा शाळेचे वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिरगुडे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गजानन राठोड,व राठोड मॅडम, वैष्णवी होमकर , प्रतीक्षा सोळनर,पुजा खेंगटे, संजीवनी बिरादार,चंद्रराणी पांचाळ, ऋतुजा सोळनर, विद्या देशमुख, आयोजन केले होते. यामध्ये इयत्ता नर्सरी ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी एकूण ५० स्टॉलची मांडणी केलेली होती. दुकानातील आयते पदार्थ न आणता जास्तीत जास्त आरोग्यास फायदेशीर पदार्थ घरीच तयार करून आणण्यावर भर देण्यात आला होता. आनंद नगरी मधून १० ते २० हजार रूपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
