Anand Nagri Utsav : जिजाई इंग्लिश स्कूल येथे आनंद नगरी उत्सव साजरा करण्यात आला
मुक्रमाबाद, बस्वराज वंटगिरे| मुक्रमाबाद येथील जिजाई इंग्लिश स्कूल शाळेतर्फे आनंद नगरीचे आयोजन (Anand Nagri Utsav) करण्यात आले या दिवशी काही विद्यार्थ्यांनी पाणीपुरी,वडापाव, इडली सांबर,शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू, सुशीला, चिवडा ,कट मिरची,पोहे,ढोकळा, टरबुज, पपई, शेंगदाणे लाडु, तिळाचे लाडू,ईतर साहित्य विक्री केले. यामधून १० ते १५ हजार रूपयांची उलाढाल झाली.
शिक्षणाचा उद्देश केवळ मुलांना साक्षर करणे नसून दैनंदिन जीवनातील व्यवहार कुशलपणे करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे असते. अशा व्यवहारांची मुलांना पावलोपावली गरज भासते. या गतिमान आयुष्यात मुलांना व्यावहारिक चातूर्याची गरज आहे. त्यांना व्यवहार कुशल बनवण्यासाठी शालेय वातावरणातच व्यवहाराच्या ज्ञानाची गरज असल्याने जिजाई इंग्लिश स्कूल येथे मुलांच्या व्यावहारिक पातळीवर अधिक चालना देण्यासाठी बाल आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते....
